बी जे देशमुख साहेब अकोल्याचे केजरीवाल आहे– अमित भांगरे

कोतुळ प्रतिनिधी
बी जे देशमुख साहेब अकोल्याचे केजरीवाल आहे त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग तालुक्यासाठी करावा असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक युवानेते अमित अशोकराव भांगरे यांनी केले
जिल्हा परिषद सदस्य रमेशकाका देशमुख यांच्या प्रयत्नातून कोतुळ शहरातील सुमारे 53 लक्ष रुपये खर्चाचे विकासकामांचे उद्घाटन झाले प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते दशरथ सावंत होते
अमित भांगरे म्हणाले की 2019 ला तालुक्यात परिवर्तन करताना तालुक्यातील जनतेच्या खूप अपेक्षा होत्या मात्र त्या आजूनपूर्ण झाल्या नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे
अजित दादा पवार ,आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून मला जिल्हा बँकेमध्ये काम करायची संधी मिळाली जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी मदत करून विजेचा प्रश्न सोडवू तालुक्यात पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करू असे अमित भांगरे यांनी सांगितले
अध्यक्षीय भाषणात दशरथ सावंत यांनी तालुक्यातील टोळी च्या राजकारणावर खरपूस टीका केली पुढारी टक्के वारीत गुंतला आहे कमिशन च्या नावाने ‘शेण खात’ असल्याचा आरोप त्यांनी केला
मी आयुष्यात काहीच मिळवलं नाही पण मला त्याचं दुःख नाही जनतेचा रेटा मोठा असतो जनतेने ठरविले की काय होते याचा अनुभव तालुक्याने 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं लोकांनी ठरविलं आणि 40 वर्षाची सत्ता उलथून टाकली 1,13,000 मते एका बाजूला आणि 55,000 मते दुसऱ्या बाजूला हा इतिहास घडविला याची आठवण श्री सावंत यांनी करून दिली
याप्रसंगी , पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक बी जे देशमुख, अकोले बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे ,माजी उपसभापती मारुती मेंगाळ , जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख ,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले,
रविंद आरोटे यांनी सूत्रसंचालन केले तर बबलू देशमुख यांनी आभार मानले यावेळी ग्रामपंचयत पदाधिकारी ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते
कोतुळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य .रमेशकाका देशमुख यांचे निधीतून व प्रयत्नातून मंजूर झालेल्या
अजिंक्य चौक ते अबितखिंड रोड काँक्रिटीकरण करणे =( १५ लक्ष रु.) साबळेवाडी रस्ता काँक्रेटीकरण करणे = (१० लक्ष रु).
मुक्ताई मंदिर ते स्मशानभुमी रस्ता काँक्रेटीकरण = (१० लक्ष रु.) या कायमचे कामांचे भूमिपूजन व
भांगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधकाम करणे = (९.५ लक्ष रु.)भांगेवाडी अंगणवाडी बांधकाम करणे = (९.४ लक्ष रु.) या कामांचे उदघाटन करण्यात आले
—/////———-