संगमनेर येथे सोमवारी पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण!
संगमनेर प्रतिनिधि
सनय प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिलेल्या खेळ मांडियेला,क्रांती ज्योती सावित्री व संदीप वाकचौरे यांच्या सृजनाची वाट या पुस्तकाचे प्रकाशन, शांती फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार वितरण सोमवार दिंनाक 11 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मालपाणी लॉन्स संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व ,नसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा.रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार असून अध्यक्षस्थान आ डॉ.सुधीर तांबे भूषविणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून आ.किरणजी लहामटे,डॉ.बालाजी जाधव उपस्थितीत राहणार आहे.
मालपाणी लॉन्स येथे होणा-या कार्यक्रमास नगराध्यक्ष दूर्गाताई तांबे,इंद्रजीतभाऊ थोरात, संगमनेर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, रामहरी कातोरे,उद्योजक गिरिष मालपाणी, जेष्ठनेते मधुकरराव नवले, शशीकांत नजाऩ, सतिष लोटके,प्रा.डॉ.मिलींद कसबे,सनय प्रकाशनाचे शिवाजीराव शिंदे,श्याम शिंदे उपस्थितीत राहणार आहे.यावेळी सन 2020-21 चे पुरस्कार कामगार नेते कारभारी उगले व सूर्यकांत शिंदे यांना दिले जाणार आहे तर 2021-22 चे पुरस्कार स्वर्गीय साथी सायन्ना एनगंदूल ,साहित्यिक के.जी.भालेराव यांना दिले जाणार आहे.जीवन गौरव पुरस्कार शेतकरी व कामगार नेते सुखदेव वर्पे यांना दिला जाणार आहे तसेच नाटय गौरव पुरस्कार राजन झांबरे,शिवराम बिडवे,वंदना बंदावने,सौ.संध्या भाटे,प्रा.संगिता परदेशी यांना देण्यात येणार आहे.त्याचबरोबर विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबददल दिव्या वर्पे,हर्षदा वर्पे,ऋतुजा मुटकूळे,सारेगम फेम सारंग भालके,पलाश शिंदे यांचा सन्मान केला जाणार आहे.
यावेळी डॉ.बालाजी जाधव यांचे संत तुकाराम ते महात्मा फुले व्हाया छत्रपती शिवाजी महाराज याविषयावर व्याख्यान होणार आहे.कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

——– –