अहमदनगरसामाजिक

अकोले नगरपंचायत चे अधिकारी व ठेकेदार व यांचेवर गुन्हा दाखल करा – प्रकाश साळवे

अकोले प्रतिनिधी

अकोले नगरपंचायत मध्ये कराराचा भंग केल्याप्रकरणी ठेकेदार व अधिकारी यांचेवर कारवाई करा अशी मागणी दलीतमित्र प्रकाश साळवे यांनी केली आहे

श्री साळवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , अकोले नगरपंचायतीने दि.२०/११/२०१८ दि. ३०/६/२०२०, दि. २८/७/२०२१ रोजी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नगरपंचायत हद्दीतील दैनंदिन अंदाजे ४ टन कचरा निर्माण होतो. ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे- विलगीकरण करणे कामी अकोले नगरपंचायतीने करार केला होता. ह्या करारात काही अटी-शर्तीबाबद उल्लेख असून यामध्ये
मुद्दा क्र. १ सदर ठेकेदाराने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व मिनीस्ट्री ऑफ एनव्हायरमेंट अॅण्ड फॉरेस्ट प्रमाणीत येथील कामाचा अनुभवाचा दाखला असावा असे असतांनाही हा दाखला घेण्यात आलेला नाही.
मुद्दा क्र.२ – घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्याची दरमहा तपासणी ठेकेदारास करणे बंधनकारक असतांना, व ते रिपोर्ट नगरपंचायतीला सादर करणे आवश्यक
असतांनाही त्याची कुठलीही आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच कोरोना सारख्या जागतीक महामारीच्या आजारात देखील आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली नाही

मुद्दा क्र. 3 घनकचरा व्यवस्थापन ठेका घेणाऱ्या कंत्राटदाराने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्रक्रियेसाठी लागणारी परवानगी घेणे बंधनकारक असतांना प्रदुषणमंडळाची
परवानगी घेतली नाही.
मुद्दा क्र. ४.- घनकचरा प्रकल्पासाठी लागणारे मनुष्यबळ त्यांना लागणारी सुरक्षा साधने (गणवेश, सेफ्टी हेल्पमेट, ग्लोज, मास्क इ. साहित्य पुरविणे कंत्राटदारास बंधनकारक असतानाही याची कुठलीही अंमलबजावणी करण्यात येत नाही.

मुद्दा क्र. ५- किमान वेतन कायद्यान्वये घनकचरा व्यवस्थापन करतांना सदर ठेकेदाराने किमान वेतन देणे, भविष्य निर्वाह निधी सुरक्षा विमा भरण्याची संपुर्ण जबाबदारी ठेकेदाराची
असतांना व एकुण ४१ कर्मचारी त्याच्याकडे आहे. परंतु ही बाब बंधनकारक असतांना ५ च व्यक्तीचे साठी त्याने हा लाभ दिला उर्वरीत बाकी कर्मचारी यांपासून वंचीत आहे. कर्मचाऱ्याची ही पिळवणुकच आहे.

मुद्दा क्र. ६- सदर ठेकेदारांनी अधिकाऱ्यांशी कर्मचारी यांच्याशी संगणमत करून दरमहा केलेल्या कामाच्या तुलनेत जास्तीची बिले काढली आहे. तरी आपण याची सखोल चौकशी करून संबंधीत ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी. सदर ठेकेदारांनी कराराचा भंग केल्याप्रकरणी त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच सदर ठेकेदार कराराचा भंग करीत असतांनाही त्याची देयके नगरपंचायत प्रशासनाने अदा केली. याबाबदही सखोल चौकशी होऊन संबंधीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कर्मचारी यांनी अनियमीतता केली. ठेकेदाराला पाठीशी घातले म्हणून संबंधीतांवरही कडक कारवाई करावी. त्यांची वेतनवाढ रोखण्यात यावी. सर्व्हिस बुकावरही नोंद करण्यात यावी. दोषींना निलंबीत करण्यात यावे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोरआमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा दलीतमित्र प्रकाश साळवे यांनी दिला आहे
——–////———

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button