रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे व्होकेशनल ॲवॉर्ड प्रदान

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे दरवर्षी व्होकेशनल ॲवॉर्ड प्रदान केले जातात .हे पुरस्कार दरवर्षी समाजातील अशा व्यक्तीस दिले जातात ज्यांनी अतिशय उच्च नैतिक मानके राखून उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण दिले आहे. तसेच समाजातील समस्या सोडवण्यासाठी आणि समाजाच्या गरजा पूर्ण करण्यात ज्यांनी आपल्या कौशल्यांचे योगदान दिले आहे अश्या व्यक्तीना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
यावर्षी हा पुरस्कार श्री किशोर चित्ते यांना आदिवासी भागातील शाळांमध्ये अध्यापनाचे अविरत कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला ,
डॉ प्रल्हाद गुठे यांनी मालेगाव सारख्या छोट्या गावामध्ये कोविड महामारी ची भयावह स्थिती असताना , स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मालेगाव येथील सरकारी हॉस्पिटल मध्ये नियुक्ती स्वीकारून अतुलनीय काम करून अनेकांचे प्राण वाचवून सरकारी रुग्णालयामध्ये उत्तम वैद्यकीय सेवा मिळू शकते हे दाखवून दिले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला ,
निलेश गायकवाड यांनी गेली १४ वर्षे आदिवासी भागातील रहिवास्यां साठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय , कुपोषणावर मात करण्यासाठी सुदृढ माता व बालक स्पर्धा घेतल्या , घरोघरी शौचालाय बांधण्या साठी पुढाकार घेतला , नव्वद दिवस संत गाडगे महाराज स्वछता अभियान राबिविले , व्यसनमुक्ती साठी विशेष प्रयत्न केले , स्वयं रोजगारासाठी त्यांनी या ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.त्यांच्या या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ,
श्री शेखर गायकवाड यांनी वृक्ष लागवडीचा वसा घेतला आहे , त्यांनी गेली २० वर्ष हुन अधिक काळ या कामात स्वतःला झोकून दिले , नुसती झाडी ना लावता त्यांची वाढ होण्या साठी पाणी घालणे , रोपाभोवती पिंजरा लावणे , वृक्ष संवर्धन करणे , पक्षा साठी नंदनवन फुलविले , आपले पर्यावरण रक्षण करण्या चे उत्तुंग काम ते अविरत करीत आहेत , यातूनंच देवराई आणि वनराई प्रोजेक्ट्स उभे राहिलेत. त्यांच्या या कार्य साठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री विवेक पेंडसे गेली अनेक वर्ष आदिवासी भाग मध्ये स्वतः जाऊन तेथील ग्रामस्थांना बरोबर चर्चा करून त्यांची पाण्याची गरज ओळखून , पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी योग्य पद्धतीने कसे साठविता येईल यावर अभ्यास करून शेत तळे बांधलीत , बंधारे बांधलेत,आणि या द्वारे तेथील रहिवास्यां च्या पाणी उपलब्धतेवर चा प्रश्न कायम स्वरूपी सोडविला या साठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पीटलच्या डिन डॉ. मृणाल पाटील यांनी सर्व पुरस्कार्थीचे अभिनंदन केले , आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रत्येकाचे समाजासाठी काहीतरी दायीत्व असुन त्यासाठी आपण समाजोपयोगी काम केले पाहिजे , जोपर्यंत आपण समाजातील तळागाळातील लोकांच्या बरोबर आपला वेळ देत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्या समस्या कळणार नाहीत , समस्या कळल्या तर त्यावर उपाय सुद्धा समजतील आणि मग आपण योग्य ते काम हाती घेऊन या समस्या सोडवून त्यांचे जीवन सुकर करू शकतो , अगदी असाच विचार आजच्या या पाचही पुरस्कार्थीनी केला ,या पुरस्कार्थींनी स्वतः कंफर्ट झोन मध्ये न राहता ऑन फील्ड काम केले , आपण स्वतः साठी जे मिळवले त्यात समाजाचा वाटा आहेच मग समाजासाठी काही ना काही आपण दिलेच पाहिजे हि भावना त्यांच्या मनात होती म्हणूनच त्याच्या हातून इतके चांगले कार्य घडले आहे ज्यासाठी रोटरी क्लब ऑफ नासिक त्यांचा गौरव करीत आहे असे त्यांनी सांगितले.
कोविड १९ च्या निर्बंध लागू असल्याने हा कार्यक्रम झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन घेतला.
व्होकेशनल अवॉर्ड्स साठी रोटरी क्लब ऑफ नासिकच्या अध्यक्षा डॉ.श्रीया कुलकर्णी , रोटे संदीप खंडेलवाल , सचिव मंगेश अपशंकर , सचिव ( उपक्रम ) विनायक देवधर , सचिन बागड , शिल्पा पारख, निलेश अग्रवाल , आदेश दादावाला , ओमप्रकाश रावत .डॉ सुप्रिया मांगुळकर ,उर्मिला देवधर , मकरंद चिंधडे , डॉ रचना चिंधडे , स्मिता अपशंकर , ऋचा केळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.