इतर
अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुख व प्रदीप हासे यांचा सत्कार!

अकोले प्रतिनिधी
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख यांची अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याने तसेच म्हाळादेवी चे सरपंच प्रदीप हासे यांची संतुजी आनंदा धुमाळ पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अकोले येथील प्रवरा ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या दोन्ही व्यक्तींची निवड ही तालुक्यातील पतसंस्था चळवळीला चालना देणारी असल्याचे यावेळी भास्करराव मंडलिक यांनी सांगितले
प्रवरा पतसंस्थेच्या कार्यालयात चेअरमन भास्करराव मंडलिक संचालक रामनाथ शिंदे, हिम्मत मोहिते प्रफुल्ल ताजने व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते
