
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळस येथील कळसेश्वर देवस्थान चे ब्रह्मलीन श्री श्री 1008 प.पु. सुभाषपूरी महाराज यांची पाचवी पुण्यतिथी निमित्ताने सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.
” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार आपले संपूर्ण आयुष्य कळस येथील उजाड टेकडीवर माळरान फुलवणारा अवलिया म्हणजे सुभाषपूरी महाराज होय. हिमालयाच्या पर्वतरांगातुन कळस गावच्या छोट्या च्या टेकडीच नंदनवन करणारे बाबा होते. संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे अनुकरण करीत गावातील प्रातविधी ला जाणारे नागरिकांची विष्ठा भरून स्वछता मोहीम राबवणारे बाबा होते. ज्या टेकडीवरून दुर्गंधी येत होते तेथून फुलांचा सुगंध दरवळू लागला. दाढी जटा वाढवून कुढलीही बुवाबाजी ला थारा न देता, अंधश्रद्ध ला खतपाणी न घालता देव, देश अन धर्म याला महत्व दिले. संत साईबाबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांनी त्यावेळी पेटवलेली धुनी आजतागायत सुरू आहे स्वतःची समाधी स्वतः तयार करून ठेवणारे बाबा होते. स्वतः डोंगरावर विहीर खोदली. गुरुपौर्णिमा उत्सव, खंडित झालेला अखंड हरिनाम सप्ताह, दत्त जयंती, आदी उत्सव सुरू केले. पाच वर्षांपूर्वी ब्रम्हमुहूर्तावर रथ सप्तमीला बाबांनी कळसेश्वर देवस्थान च्या टेकडीवर आपला प्राणत्याग केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कार्यक्रम रद्द केले आहे. पहाटे पाच वाजता प पु सुभाष पुरी महाराज यांचे समाधी ची पूजा होणार आहे. सकाळी नऊ वाजता भजन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट, कळसेश्वर भजनी मंडळ, प.पु. सुभाष पुरी महाराज भक्त मंडळ व ग्रामस्थ यांनी केले आहे.
