सेवानिवृत्ती निमित्त (फुलगाव ता. हवेली )शाळेस एक लाख रुपयाची देणगी!

फुलगाव दि.१५,मार्च २०२६
एच यु धोत्रे फ्री स्कूल फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे या शाळेचा १६७ वा वर्धापन दिन व विविध गुणदर्शन कार्यक्रम मा. संजयजी आनंदनाथ धोत्रे अध्यक्ष , नवनिर्वाचित जि.प.सदस्य पै.किरण साकोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
हरी उद्धव धोत्रे यांनी १५ ,मार्च१९६० रोजी स्थापन केलेल्या ग्रामीण भागातील या शाळेने पाच पिढ्या ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले . कै.शंकर हरी धोत्रे, कै.त्र्यंबक हरि धोत्रे, कै.आप्पासाहेब तथा आनंदनाथ त्र्यंबक धोत्रे ,कै.मंदाकिनी धोत्रे बाई या सर्वांनी आपले बहुमूल्य योगदान या शाळेसाठी दिले , कै. आप्पासाहेब तथा आनंदनाथ त्र्यंबक धोत्रे यांना १९६९ साली राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता . आप्पासाहेबांचे शिष्य कै. ना.वि. कुंभार गुरुजी यांनाही १९९२साली राष्ट्रपती पदक पदक प्राप्त झाले होते.
ग्रामीण भागातील एक नावाजलेली शाळा म्हणून या शाळेची ख्याती आहे . अनेक नवनवीन शैक्षणिक प्रयोग या शाळेत झाले व होत आहेत.

१६७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्ती निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदा पंडित कुंभार व त्यांचे पती पंडित विठोबा कुंभार यांनी आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ शाळेस एक लाख रुपयाची देणगी दिली.
याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पैलवान किरण संपतराव साकोरे, उपाध्यक्ष नारायणराव खुळे, सरपंच राहुल वागस्कर ,सरपंच कांताराम वागस्कर कुंभार सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी सरपंच मंदानानी साकोरे,आण्णा वागस्कर, आदर्श सरपंच सुनील वागस्कर वागस्कर , शारदाताई वागस्कर ,श्रीमती सुशीला वागस्कर, आदिनाथ साकोरे ,केकान सर , करपे सर ,वामन खुळे, विठ्ठल खुळे ,दत्तात्रय वागस्कर, गुलाब येवले , चंद्रकांत येवले, नवनाथ वागस्कर आदि मान्यवर, शाळेचे माजी विद्यार्थी ,ग्रामस्थ , महिला वर्ग, ग्राम पंचायत पदाधिकारी , विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती पोटफोडे मॅडम यांनी केले , तर अश्विनी खंडे मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वागस्कर यांनी केले .
आदिनाथ साकोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान भोजन दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक चव्हाण सर ,कांबळे सर ,स्वाती पोटफोडे , अश्विनी खंडे पुनम इंगळे प्रणिता पाटील, ज्योती यनभर, दिपाली इंगळे, वैशाली खंडे मावशी परिश्रम घेतले.



