आबासाहेब काकडे महाविद्यालयात रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या १०४ व्या जयंती महा निमित्ताने आज आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय, शेवगाव या ठिकाणी इयत्ता अकरावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न झाले .
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे बालरोगतज्ञ डॉक्टर किशोर पाचारणे हे होते.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे ,डॉ. शुभम मिरपगार,आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी बोधेगाव येथील प्रा .असिफ शेख, प्रा .खरात प्रा .नांगरे मॅडम ,कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. वसंत देशमुख, प्रा . मंजुश्री बुधवंत आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर किशोर पाचरणे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले .त्यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचा इतिहास सांगितला. प्रत्येकाने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राहण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. तसेच आहारात फळे , पालेभाज्या यांचे प्रमाण वाढवावे.प्रत्येकाला आपला रक्तगट माहीत असणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले .
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते यांनी केले .सर्व विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाकडून आयोजित या मोफत रक्त रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे त्यांनी अवाहन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा . प्रतिमा उकिर्डे यांनी केले तर आभार प्रा .ज्ञानेश्वर लबडे यांनी मानले .रक्तदान तपासणी शिबिरास आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.