राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ११/०२/२०२२

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २२ शके १९४३
दिनांक :- ११/०२/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:००,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२७,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १३:५३,
नक्षत्र :- मृग समाप्ति ३०:३७,
योग :- वैधृति समाप्ति १९:४८,
करण :- वणिज समाप्ति २७:१२,
चंद्र राशि :- वृषभ,(१७:०६नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- मकर – धनिष्ठा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- रात्रि. ०८नं. चांगला दिवस,

राहूकाळ:- सकाळी ११:१८ ते १२:४४ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२६ ते ०९:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:५२ ते ११:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारि १२:४४ ते ०२:०९ पर्यंत,

दिन विशेष:-
भद्रा २७:१२ नं.,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾


🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २२ शके १९४३
दिनांक = ११/०२/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
जवळचा प्रवास कराल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ
मानसिक चंचलता जाणवेल. कमिशनमधून फायदा होईल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे. आवडी निवडी बाबत दक्षता बाळगाल.

मिथुन
वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लोकोपवादाला बळी पडू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

कर्क
मानसिक स्थैर्य जपावे. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल.

सिंह
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या
नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.  वारसाहक्काची कामे लाभदायक ठरतील. अती अपेक्षा बाळगू नका.

तूळ
अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत कराल. मनातील अकारण भीती दूर सारावी. मुलांचे विचार समजून घ्यावेत.

वृश्चिक
अकारण होणारा खर्च टाळावा. भडक शब्दांचा वापर करू नये. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

धनू
आहाराकडे लक्ष ठेवा. पित्त विकार वधू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका.

मकर
आवाक्याबाहेर खर्चाचा ताळमेळ घालावा. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांशी समझोता करावा लागेल.

कुंभ
कामातील दिरंगाई टाळावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल.

मीन
झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडावे. घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button