–विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
कोरोना मुळे दोन वर्षांपासून शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनसाठी भाविकांची गर्दी ओसरली होतीं मात्र कोरोना चे संकट दूर झाल्याने आता पुन्हा भाविकानाची गर्दी वाढू लागली आहे
आज १२ फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांनी दिवसभर शनिदर्शन घेतले ,या गर्दीने मंदिर परिसर गजबजल्याचे चित्र पहावयास मिळाले
,एक लाखा पेक्षा अधिक भाविकांची आज दर्शन घेतले शनी देवकी जय,शनिमहारज की जय,जय शनिदेव,या जयघोषात अक्षरशः कोरोनाचा बॅकलॉग भरून निघाला,व अर्थकारण गतिमान झाले.
राज्यातून,जिल्ह्यातून,परिसरातील भाविकांनी दिवसभर शनिदर्शनसाठी मोठी गर्दी केली होती, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने,तसेच दुसरा शनिवार,रविवार सुट्टी,त्यामुळेच गर्दीचा उंचाक पाहावयास मिळला.
दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन साठी तासन्तास रांगेत उभे राहून वेळ लागत होता. देवस्थान ट्रस्ट ने दर्शन व्हावे यासाठी उपाययोजना केल्या होत्या.दर्शनासाठी भाविकांनी शनिचौथरा ते प्रवेशद्वार अंतरापर्यंत रांग गेली होती दर्शनासाठी तासन्तास लागत होता.एस टी महामंडळाचा संप मिटला असता तर अजून गर्दीत भर पडली असती.भाविक जे वाहन मिळेल त्या वाहनाने काही भाविक शनिशिंगणापूरात दाखल झाले होते. शनी मंदिर रात्री प्रसन्न वाटून एकप्रकारे जीवन उजळून निघत होते,असे आनंददायी वातावरण पसरले होते.यावेळी सकाळपासून अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे लक्ष देऊन होते.
व्यापारी सुखावले
कोरोनाच्या संकटामुळे भाविकांनी शनिशिंगणापूरात पाठ फिरवली होती,मात्र काल पहाटेपासून दिवसभर लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने परिसरात जिकडे पाहावे तिकडे भाविक दिसत होते, त्यामुळे व्यापरीवर्गही सुखावला आहे.आता कोरोनाचा बॅकलॉग भरून निघेल, असे संवादही ऐकायला मिळाले.
प्रसादबर्फीचा घेतला आनंद
शनिदर्शन झाल्यानंतर भाविकांनी घरी प्रसाद नेण्यासाठी शनीचा प्रसाद बर्फी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्याचा परिणाम अर्थकारण फिरणार आहे.
पंजाबमध्ये चालू असलेल्या निवडणुकीत कलाकार सोनुसूद यांची बहीण मालविका सूद यांच्या विजयासाठी भीमराज महाले व त्यांच्या चाहत्यांनी शनी अभिषेक केला