दिवसा वीज मागणाऱ्या शेतकऱ्याच्या,आमदाराने कानशीलात लगावली.

आमदार लहामटेंच्या निषेधार्थ आज अकोलेत रास्तारोको
अकोले (प्रतिनिधी)-
रात्री बिबट्याची भीती आहे बाहेर पडता येत नाही दिवसा वीज दया अशी मागणी एका शेतकऱ्याने आमदाराकडे केली तर आमदाराने वीज देण्याऐवजी त्याच्या कानाखाली लगावली
अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील शेतकऱ्याच्या कानाखाली मारणाऱ्या आमदार डॉ किरण लहामटे यांचे निषेधार्थ उद्या गुरुवारी (दि 20) अकोल्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
लिंगदेव येथील शेतकरी वाळीबा होलगीर यांना आ. डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याच्या घटनेच तीव्र पडसाद अकोले तालुक्यात उमटताना दिसत आहे. समाज माध्यमातून आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. यापूर्वी आमदार डॉ. लहामटे यांचेकडून तालुक्यातील नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या घटनांना लिंगदेव घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा समाज माध्यमातून उजाळा दिला आहे.
अकोले तालुक्याचे विद्यमान आ.डॉ. किरण लहामटे हे दोन दिवसांपूर्वी लिंगदेव येथे वाचनालय इमारतीच्या उद्घाटना निमित्त आले असता लिंगदेव गावातील सर्व सामान्य शेतकरी वाळीबा होलगीर यांनी दिवसा वीज देण्यात यावी, रात्री बिबटयांची खूप भिती आहे हा प्रश्न विचारण्या आधीच आ. डॉ. किरण लहामटे यांनी संबंधित शेतकरी वाळीबा होलगीर यांच्या कानाखाली जोरदार थप्पड मारली चार चौघात हा प्रश्न विचारल्याने आमदार संतप्त झाले आणि शेतकऱ्याचे कांना खाली लगावली आणि तेथून काढता पाय घेतला मंगळवारी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे व पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर कानडी समाजाचे भगवान म्हतारबा करवर, लहानु निवृत्ती सदगीर, पंढरीनाथ विठोबा चावडे, विठ्ठल सावळेराम होलगीर, एकनाथ विष्णु बेनके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सोमवारी लिंगदेव ग्रामस्थ व कानडी समाजाच्या
पदाधिकाऱ्यांनी निषेध सभा घेत आ. डॉ. किरण लहामटे यांच्या कार्य पद्धतीवर टीकास्त्र सोडले होते. या घटनेचे तीव्र पडसाद अकोले तालुक्यातील राजकीय क्षेत्रात उमटले आहे. अनेकांनी सोशल मीडियातून आमदारांच्या या वृत्तीचा निषेध केला आहे. आ. डॉ. लहामटे यांच्या निधेषार्थ तालुक्यातील कानडी समाज व तालुक्यातील सजग नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अकोले येथील महात्मा फुले चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
—————-



