शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील अनेक गावच्या विकास संस्थेचा कार्यकाळ यापुर्वीच सपंलेला होता मात्र कोरोना महामारीच्या संकटांमूळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, सध्या तालुक्यात संस्था निवडणुका धडाक्यात चालू आहेत. आनेक गावच्या निवणुका बिनविरोध करून गाव पुढं- यांनी आपल्या नेत्यापुढे वाहवा मिळवली आहे. ४१२ सभासद पात्र असलेली भायगाव संस्था सुरूवातीला बिनविरोध होईल स्थिती असतांना आचानक आनेक सभासदांनी उमेदवारी दाखल केल्याने अखेर बिनविरोध होण्याचे आशा मावळली आहे.राजकिय दृष्ट्या महत्वांची समजली जाणारी भायगावच्या संस्थेची निवडणुक प्रक्रिया सध्या पार पडत आहे. आजपर्यत या संस्थेचा कारभार चालवणारे संचालक मंडळ माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी सहकारी साखर कारखाना उदयोग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली करित आलेले आहेत. भायगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी २८ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण कर्जदार साठी उमेदवारी - सौ.मिनाक्षी कल्याण आढाव, सुरज खंडेराव देशपांडे, विठ्ठल कुंडलिक लांडे, अमोल रावसाहेब देशपांडे, कल्याण केशव आढाव, विठ्ठल रमेश आढाव, गणेश लक्ष्मण निमसे, अशोक कचरू आढाव, रमेश एकनाथ आढाव, लक्ष्मण रामदास शेकडे, सोपान नामदेव लांडे, शहाराम चंद्रभान आगळे, ज्ञानेश्वर शेषेराव दुकळे, उध्दव बाळासाहेब दुकळे, संतोष एकनाथ दुकळे, संदिप कडूबाळ दुकळे, चांगदेव बाबुराव कदम, रामेश्वर जयवंत दुकळे महिला राखीव करिता - सौ.मिनाक्षी कल्याण आढाव, सौ.आशादेवी लक्ष्मण लांडे, सौ.जयश्री रमेश दुकळे, सौ. सुनिता कैलास लांडे, इतर मागास प्रवर्गासाठी - अॅड.सागर हरिचंद्र चव्हाण, पांडुरंग मुरलीधर आढाव भ.वि.जा.ज करिता - सुनिल महादेव शेकडे, अंबादास पंढरीनाथ सांगळे, अ.जा / अ.ज- संजय हरिचंद्र कानडे, देवीदास मोतीलाल तांबोरे यांनी दाखल केले आहेत.२५ / ०२ / २०२२ पर्यत अर्ज माघारीची मुदत आहे.तर २८ / ०२ / २०२२ ला निवणुक चिन्ह वाटप व ११ / ०३ / २०२२ रोजी मतदान होईल व त्याच दिवशी निकाल जाहिर करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. थोरात तर सहाय्यक म्हणुन भायगाव संस्थेचे सचिव काकासाहेब विखे काम पहात आहे.