श्री क्षेत्र तुळजाभवानी संस्थान ,तुळजवाडी येथे संत महापुरुषांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न.

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तुळजवाडी येथील तुळजाभवानी संस्थान या ठिकाणी श्री क्षेत्र भगवान गडाच्या अधिपत्याखाली परमश्रद्धेय डॉ न्यायाचार्य श्री नामदेव महाराज शास्त्री यांच्या आर्शिवादाने आणि
शांतीब्रह्म श्रीगुरू महंत आदिनाथ महाराज शास्त्री श्री क्षेत्र तारकेश्वर गड यांच्या मार्गदर्शनाखाली
ब्रह्ममुर्ती सर्वश्री संत महापुरुषांचा पुण्यतिथी सोहळा
११ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तुळजाभवानी संस्थान तुळजवाडी येथे संपन्न झाला
संत पूजन आणि दीपप्रज्वलन परमपूज्य ज्ञानेश्वरी तत्त्वचिंतक हभप तुळशीराम महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते*तसेच समस्त ग्रामस्थ तुळजवाडी यांच्या शुभहस्ते झाले
*कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची पुजा तसेच पुष्पहार श्री सन्माननीय हभप जाधव श्री क्षेत्र आळंदी देवाची अंकिता मोबाईल यांच्या हस्ते करण्यात आले*
पुण्यतिथी सोहळ्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ महंत संतोष महाराज शास्त्री खताळ सर श्री क्षेत्र तुळजाभवानी संस्थान चे मठाधिपती यांची झाले
सायंकाळी ५ते६ प्रवचन सेवा ज्ञानेश्वरी तत्त्वचिंतक हभप तुळशीराम महाराज शास्त्री यांची झाली.
श्री क्षेत्र भगवान गड यांची झाली.
रात्री ९ ते ११ किर्तन सेवा महंत अदिनाथ महाराज शास्त्री श्री क्षेत्र तारकेश्वर गड यांच्या अमृतवानीने संपन्न झाली
.
आदिनाथ महाराज म्हणाले की गो मातेची सेवा हीच ३३ कोटी देवांची सेवा आहे असे प्रतिपादन महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सांगितले
वारकरी संप्रदायातील महापर्वकाळ माघ शुद्ध दशमी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला असा आजचा पवित्र दिवस आहे
सकल संत मांदियाळी यांच्या गुरू परंपरेचा,मंत्र बोधाचा अनुभव आणि सद्गुरू कृपेने सगुण साकार परमेश्वर प्राप्ती झाली
याबाबत संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर
महंत श्री संतोष महाराज खताळ यांनी आपल्या किर्तन सेवेतून यथार्थ वर्णन केले.
सद्गुरू हे ब्रह्मनिष्ठ , श्रोत्रिय, कृपाळू असावेत असे प्रतिपादन महंत श्री संतोष महाराज खताळ यांनी सांगितले
यावेळी किर्तनाला साथ देणारे
हभप तुळशीराम महाराज शास्त्री हभप हरी महाराज राऊत,हभप शिवराज महाराज शास्त्री,हभप नारायण महाराज,अशोक पालवे कैलास पालवे,दौंड पाहुणे बडेवाडी टाळकरी,विणेकरी गंगाधर ढाकणे काटेवाडी आदी भाविक उपस्थित होते
याप्रसंगी
विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सौ सुनीताताई गोकुळ दौंड यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली
खरवंडी कासार येथील व्यापारी क्षेत्रातील,पाथर्डी तालुक्यातील
धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातीलअनेक मान्यवर उपस्थित होते
येळी,पिंपळगाव,बोंदरवाडी, बडेवाडी,दैत्यनांदुर,तिनखडी, टाकळी,पारगाव,ढाकणवाडी, मालेवाडी,किर्तनवाडी,खरवंडी कासार,मिडसांगवी,काटेवाडी, ढगेवाडी,संपूर्ण परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी महाप्रसादाचे अन्नदाते येळी येथील
राम भानुदास ढोले
येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सकाळी ११ पासून ते रात्री ११ पर्यंत भोजन व्यवस्था केली होती.
या सर्व कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ व सर्व युवा मित्र परिवाराने सहकार्य केले