राजेश्वरी कोठावळे यांना सकाळ मिडीयाचा महाराष्ट्र आयडॉल ‘पुरस्कार

‘
पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांना सकाळ माध्यम समूहाचा महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये असलेले उल्लेखनीय कार्य कोरोना काळात केलेले कार्य याची दखल सकाळ माध्यम समूहाच्या वतीने घेण्यात आली असून सकाळ माध्यम समूहाने केलेला गौरव हा पारनेर तालुक्याच्या दृष्टीने गौरवास्पद असून राजेश्वरी कोठावळे यांना हा पुरस्कार शिर्डी येथे प्रदान करण्यात आला.
दरम्यान राजेश्वरी कोठावळे ही एक आंतरराष्ट्रीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. क्रीडा क्षेत्रात असलेले उल्लेखनीय कार्य तसेच सामाजिक क्षेत्रात असलेले उल्लेखनीय कार्य आणि महिलांच्या विविध प्रश्नांसाठी व समस्यांसाठी नेहमी लढणार्या राजेश्वरी ताईंचा हा गौरव खऱ्या अर्थाने महिला सन्मानाचा गौरव असून सकाळ माध्यम समूहाने खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
यावेळी राजेश्वरी कोठावळे बोलताना म्हणाले की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून मी नेहमी काम करत आहे . माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने समाजामध्ये लढण्याची मला ताकद मिळते हा सकाळ माध्यम समूहाच्या महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार मी माझ्या आई वडिलांना समर्पित करते. त्यांनी मला जो पाठिंबा दिला व देत आहेत हे मला काम करण्यासाठी बळ देत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राजेश्वरी कोठावळे यांचे अभिनंदन केले आहे.