धामणगाव पाट येथे श्री खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे सोमवार (दि १४ )पासून श्री खंडोबा यात्रा उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
सोमवार दि.१४/०२/२०२२ रोजी दुपारी ४ वा. विश्वकर्मा प्रतिमेची भव्य मिरवणुक होणार आहे सायं.७.30 वा.महाआरती रात्री.८ वा दिपक राऊत सर यांचे व्याख्यान तर रात्री… ८.30 वा.महाप्रसादाचे आयोजन केले आहे
मंगळवार दि.१५/०२/२०२२ रोजी सायं.७ वा. भंडारा (महाप्रसाद) होणार आहे तर रात्री ८.३० वा.कोमलताई पाटोळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे
बुधवार दि.१६/०२/२०२२ पहाटे ५ वा. महापुजा व अभिषेक पहाटे . महाआरती सकाळी ८वा. काठीची भव्य मिरवणूक होणार आहे रात्री ७.30 वा. तळी भंडारा कार्यक्रम
रात्री ९ वा. फटाक्यांची भव्य दिव्य आतिषबाजी
रात्री ९.३० वा. मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम तर गुरुवार दि.१७/०२/२०२२
सकाळी ९ ते ११ वा. हजेरीचा कार्यक्रम होणार आहे
परिसरातील भाविकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन धामणगाव पाट ग्रामस्थ व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे
—- ——-
