इतर
पाथर्डीतुन जाणाऱ्या महा मार्गावर अमोल गजे यांची गांधीगिरी!

अमोल भैया गजेऺ नी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवले
अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
अपघाताला निमंत्रण देणारा पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव शिवारात येथील राष्ट्रीय महामार्गावर( एम एच 61) पडलेले खड्डे अमोल भैया गजेऺ यांनी बुजवले स्वखर्चातून मुरूम टाकून हे खड्डे बुजवले यामुळे या ठिकाणाहून जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षापासून चालू आहे ठेकेदाराचे गलथान कामामुळे या कामांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहे आणि अपुरे काम आहे. अपुऱ्या कामातही सुस्थिती नसल्याने अपघात होऊन अनेकांचे जीव या रस्त्याने घेतले खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहे
मात्र राजकिय पक्षांनी राजकारण न करता एकत्र येऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावणे आवश्यक आहे
ठेकेदार ,शासकीय अधिकारी ,कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने अमोल गजे यांनी गांधीगिरी करत रस्त्यावरील खड्डा बुजून प्रवाशांना दिलासा दिला व या ठिकाणावरून वाहतूक सुरळीत केली आहे. त्यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केल्याने त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे