वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन अनाथ मुलांना पुस्तकाचे वाटप

सोनई–नेवासा तालुक्यातील भीम योद्धा फुले,शाहू,आंबेडकर, चळवळीतील भा.दलित पॅंथरचे माजी तालुका अध्यक्ष, व रि. पा.इ.चे विद्यमान जिल्हा उपाअध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व सत्काराच्या खर्चाला फाटा देत अनाथ मुला मुलींना वही,पुस्तकाचे वाटप,वृक्षारोपण, अश्या विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.

.विजय जगताप हे गेली अनेक वर्षांपासून दलित समाजातील तसेच वंचित घटकांना न्याय हक्कासाठी लढा देत जगताप यांनी विविध क्षेत्रात योगदानाबद्दल जीवन राबवले,त्यांचा विविध ठिकाणी स्नेही कार्यकर्त्यांनी सन्मान केला.
यावेळी वंचित बहुजन नेवासा आघाडीचे तालुका अध्यक्ष आयु.उदय कर्डक, नेवासा राष्ट्रवादीचे सरचिटणीस .सनी साळवे,कार्यकर्ते विजयअंकल गायकवाड,माजी सरपंच दादासाहेब वैरागर, सदस्य सचिन पवार,सोना काकडे.सुनील पाडळे, .जनार्धन खरात, अमोल साळवे,.निळकंठ काकडे,.अमोल कर्डक, .फिलिप साळवे,.आकाश काकडे,.प्रकाश पाडळे, .अविनाश दळवी,.भाऊसाहेब गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.