वीज वितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी घेतले कोंडून!

वीज तोडल्यामुळे शेतकरी आक्रमक
दादा भालेकर
टाकळी ढोकेश्वर
वीज बील थकल्याने महावितरणने वारणवाडी सबस्टेशनवरील सर्व शेती पंपांचा विजपुरवठा बंद केला आहे. तसेच वीज बील भरण्यास आम्ही तयार आहोत वीज पुरवठा जोडण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत पुर्ण रक्कम भरा तरच वीजपुरवठा चालू करु असे सांगितले.
त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळपासून वारणवाडी सबस्टेशनच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच आम्ही थकित वीज बील भरण्यास तयार असूनही वीजपुरवठा तातडीने पुर्ववत चालू करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत;ला कोंडून घेतले आहे. जोपर्यंत खंडीत विजपुरवठा चालू होतं नाही तोपर्यंत आंदोलनस्थळीच गुराढोरांसह मुक्काम ठोकण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. जवळपास परिसरातील २०० ते ३०० शेतकरी आंदोलन स्थळी उपस्थित आहे.
या आंदोलनात शिवप्रहार संघटनेचे संजिव भोर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर, चेअरमन संजय भोर, सरपंच सतिश पवार, शिवम पवार, भाऊसाहेब टेकुडे, भूमिपुत्र संघटनेचे संजय भोर, सरपंच पोपट दरेकर, मंजाबापु वाडेकर, बंडु गोळे, नंदन भोर, कृष्णा दाते, अविनाश भोर, बाळासाहेब वाडेकर, संतोष टेकुडे, कुंडलीक वाकळे, पंडीत पवार, अशोक खैरे, दिलीप पवार, विजय पवार, जितेंन्द्र पवार यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित आहे.

शेतकऱ्यांचा मुक्काम आता विजवीतरण कार्यालयात
वारणवाडी सबस्टेशनवरील सर्व शेती पंपांचा विजपुरवठा बंद झाला आहे.परीसरातील सर्व शेतकरी सबस्टेशनला मोठ्या संख्येने जमून आंदोलन करीत आहेत. विजबील भरणे बाबत सर्वमान्य तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी हटणार नाहीत. प्रसंगी गुराढोरांसह सबस्टेशनला मुक्काम ठोकण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. हक्कासाठी, न्यायासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.