अहमदनगरसामाजिक

अस्थीरक्षा विसर्जन न करता दिला प्रदूषण मुक्तीचा संदेश !

अकोले प्रतिनिधी

ब्रह्मलिन प.पु सुभाषपूरी महाराज यांचे परमशिष्य व कळस गावचे माजी उपसरपंच श्री.मारुती जिवबा वाकचौरे यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे अस्थीरक्षा विसर्जन पाण्यात न करता वृक्षारोपण करून बाबांच्या वृक्षसंवर्धनाचे कार्य व प्रदूषण मुक्तीचा संदेश दिला आहे.      

  प.पु सुभाष पुरी महाराज यांना कळस गावामध्ये आणण्यात मोलाचे योगदान असणारे मारुती वाकचौरे यांचे बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी निधन झाले. सन 1980- 81 साली ते त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळा झाला याला दशरथ वाकचौरे, गंगाराम ढगे, अन मारुती वाकचौरे हे तिघे गेले या कुंभमेळात एका साधू ची भेट झाली त्यांच्या ओळखीतून त्यांना गावच्या भेटीच निमंत्रण दिले. ते साधू गावाला त्यानंतर यथा अवकाश गावी आले ते साधू म्हणजे सुभाष पुरी महाराज होय. त्यांनी कळसेश्वर टेकडीवर वृक्षारोपण करून टेकडीचे नंदनवन केले.        कळस गावातील मारुती जिवबा वाकचौरे हे अप्पा नावाने परिचित होते. गावचे उपसरपंच होते. कळसेश्वर भजनी मंडळात उत्कृष्ट गायक व वादक होते.       हभप विष्णू महाराज वाकचौरे, हभप देवा महाराज वाकचौरे, हभप गणेश महाराज वाकचौरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा चे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, सतिष वाकचौरे उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य जिजाबा वाकचौरे, अण्णासाहेब वाकचौरे, देवचंद वाकचौरे, प्रमिला मालुंजकर, आदित्य वाकचौरे, योगेश वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे यांनी नियोजन करून वृक्षसंवर्धनाचे जबाबदारी घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button