डाॕ.डी.वाय. पाटील महाविद्यालयात ‘सावित्री महोत्सव’ साजरा.

पुणे दि १४
डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी येथे १४ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी विकास मंडळाकडून ‘ सावित्री महोत्सव’ साजरा करण्यात आला.
या महोत्सवाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. डी. पाटील , सचिव डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त स्मिता जाधव , प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभा च्यानिमित्त विशेष बाब म्हणून सावित्री महोत्सवाचे महाविद्यालच्या विद्यार्थी विकास मंडळाकडून आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवानिमित्त मराठी विभागाचे प्राध्यापक भागवत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रा. देशमुख यांनी ‘सावित्रीबाई यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्ये’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राबरोबर त्यांनी ज्या प्रतिकूल परिस्थिती शिक्षणाची ज्योत पेटवली त्याबरोबर जे सामाजिक कार्ये केले त्याबाबत त्यांनी आढावा घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रोवली त्यामुळे आज स्त्रीयां पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बबलू नवले यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून प्रा. सतिश ठाकर प्रा. रोहित वरवडकर यांनी भूमिका पार पाडली.
या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागप्रमुख डाॕ. विजय गाडे, कला शाखाप्रमुख प्रा.गणेश फुंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॕ. मिनल भोसले, प्रा. खलिद शेख उपस्थित होते. त्याबरोबर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.