इतर

सुवर्णपदक विजेत्या मल्लांच्या कुस्त्याने रंगला खेडले परमानंद येथील कुस्त्यांचा जंगी सामना.!

.
दत्तात्रय शिंदे

माका प्रतिनिधि

सालाबाद प्रमाणे दोन वर्षाच्या कोरोणा काळाच्या खंडानंतर
एक नवी उभारी घेऊन मोठ्या जोमाने खेडले परमानंद येथे राजबक्ष यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य-दिव्य असा राज्यस्तरीय कुस्त्यांचा सामनाआयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषद सदस्यअर्थ व पशुसंवर्धन विभाग सभापती मा. सुनील भाऊ गडाख.
या सामन्याचं लक्षवेधी आकर्षण ठरले चांदीचे चार गदा व रोख स्वरूपातली रक्कम. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील ज्येष्ठ पहिलवानांच्या नागरी सन्मान फेटा व श्रीफळ देऊन करण्यात आला यामध्ये खेडले परमानंद गावचे भूषण कुस्ती सम्राट पै हसन भाई इनामदार, दत्तात्रय बर्डे, हिरामण गांगवे, वळण पिंपरी चे पोपट पहिलवान,
व तद्नंतर कुस्त्यांचा आखाडा ला सुरुवात झाली.
प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या, त्यानंतर मध्यमवर्गीय कुस्त्या, युवकांच्या कुस्त्या, व शेवटी राज्यस्तरीय स्वर्ण पदक विजेत्या मल्लांच्या कुस्त्या अशा प्रमाणे नियोजनबद्ध व शिस्तप्रिय अशा वातावरणात कुस्त्यांचा जंगी सामना रंगला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले अर्थ व पशुसंवर्धन सभापती माननीय सुनील भाऊ गडाख यांनी कुस्ती सामन्याचे नियोजन पाहून अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले. त्यांचे सहकारी शिरीष काका हेसुद्धा सामन्यासाठी उपस्थित होते. खेडले परमानंद ग्रामस्थांच्यावतीने सर्व सन्माननीय मान्यवरांचा फेटा व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दिगंबर अंबिलवादे यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिले, तर मोहम्मद भाई इनामदार यांनी ग्राउंड तयार करण्यासाठी ट्रॅक्टर व रोटा देऊन पूर्ण ग्राउंड व्यवस्थित स्वतःच्या अनुभवी दृष्टीने तयार केले. कार्यक्रमाला आलेली रंगत पाहून पोपट नाना राजळे यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले. सुरेश चव्हाण यांनी दोन हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देऊ केले.
यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या नियोजनबद्ध नियोजनाने सर्व राज्यातून आलेले मल्ल व कुस्तीप्रेमी भारावून गेले. जबरदस्त साऊंड सिस्टिम. भव्य स्टेज, 1000 मीटर व्यासाचे ग्राउंड, कुस्तीप्रेमी प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जेआर, त्याच प्रमाणे कॉमेंट्री साठी ब्राह्मणीचे मल्ल सोमनाथ हापसे यांनी सर्व प्रेक्षकांना भारावून टाकले.
गावातील जेष्ठ नागरिक नानासाहेब तुवर चेअरमन मुळा सहकारी साखर कारखाना, ग्राम भूषण ,कुस्ती सम्राट हाजी पै. हसन भाई इनामदार व सेंद्रिय शेती पुरस्कर्ते सूर्यभान आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बक्षीस जाहीर.
यामध्ये १)प्रथम बक्षीस :-२१००० व चांदीची गदा पै योगेश वैरागर यांच्या सौजन्याने.
२) द्वितीय बक्षीस:-१५०००
चांदीची गदा आल्लू भाई इनामदार यांच्या सौजन्याने
३) तृतीय बक्षीस:-११००० चांदीची गदा नयुम इनामदार यांच्या सौजन्याने
४) चतुर्थ बक्षीस:-११०००, चांदीची गदा ,अक्षय आघाव यांच्या सौजन्याने.
५) पाचवे बक्षीस:-११००० सरपंच राजभाऊ राजळे यांच्या सौजन्याने.
६) सहावे बक्षीस:-११००० नवाज इनामदार यांच्या सौजन्याने
मानाचे मानकरी ठरले संभाजी राजे भवार प्रथम पारितोषिक , द्वितीय अतुल रायकल, तृतीय राम वणे, चौथे बक्षीस विकास डमाळे, पाचवे बक्षीस शुभम लांडगे, सहावे बक्षीस समीर कॅटगीर
कार्यक्रमाचे नियोजन सरपंच राजूभाऊ राजळे तंटामुक्ती अध्यक्ष दगु बाबाब हवालदार त्याचप्रमाणे, मोहम्मद इनामदार, मुनीर भाई इनामदार, नानासाहेब केदारी,नयुम इनामदार, राजू महानोर, राजेंद्र बर्डे, काशिनाथ तुवर, रंजीत मोकाशी, अल्लू भाई इनामदार, योगेश वैरागर,ताहीर इनामदार, अन्वर इनामदार, फकीर मोहम्मद हवलदार, युसुफ हवलदार, अक्षय आघाव,रोहिदास बर्डे, अजित इनामदार, संदीप केदारी, प्रल्हाद अंबिलवादे, पांडुरंग बर्डे, संजय मोकाशी, बन्या बापू गांगवे, मोसिम शेख, विशाल गडाख, अशोक शिंदे, विजय शिंदे, राहुल भुजबळ, भाऊसाहेब राजाळे, सागर भुजबळ, संजय दुशिंग,योगेश रोठे,इक बाल इनामदार,अशोक ब्राह्मणे, डॉक्टर गुरसाळ, पांडुरंग तुवर,दादासाहेब रोठे, आदी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button