पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुळा च्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन!
खा यशवंतराव गडाख व ना शंकरराव गडाख,खा सदाशिवराव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती.
विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या 80 कोटी रुपये खर्चाच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्र दि .18 फेब्रु 2022 रोजी दु 2 वाजता पर्यटन व पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते मुळा सहकारी साखर कारखाना कार्यशाळावर होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा उद्योग समुहाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख असणार आहेत. मंत्री ना शंकरराव गडाख ,मा खा सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. वर्षाला अडीच कोटी लिटरचे उद्दिष्ट ठेवलेल्या प्रकल्पासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व निकष संभाळून झिरो लिक्विड डिस्चार्ज या तत्त्वावर मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादित होणारा स्पेंटवॉश बॉयलर इंधन म्हणून वापरला जाणार आहे तसेच प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. केंद्र सरकारने सन 2025 पर्यंत 8 ऐवजी 20 टक्के इथेनॉल इंधन मिश्रण करायचे धोरण जाहीर केले. रोजची 1.5 लाख लिटर उत्पादनासाठी लागणारी सर्व मशिनरी, साठवण टाक्या, इमारत व नवीन बॉयलर उभारणी होऊन प्रकल्पाचे काम पुर्ण आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विज प्रकल्प व यंदाही गळीत हंगामासाठी करण्यात आलेला विस्तारही यशस्वी झाली.डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्प उभारणीनंतर सभासद,ऊस उत्पादक शेतकरी ,नेवासा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
ना आदित्य ठाकरे यांचा नेवासा तालुक्याचा पहिलाच दौरा असल्याने नेवासा तालुक्यासह, नगर जिल्ह्यातील शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण आहे.
फोटोओळी…
सोनई ता नेवासा मुळा सहकारी साखर कारखान्याने 80 कोटी रुपये खर्चून उभारलेला डिस्टलरी व इथेनॉल निर्मिती प्रकल्प.