
शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथे शिवजयंती निमित्त अश्वारूढ पुतळावर स्वार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली
औरंगाबाद येथील आर आर फौडेशन चे विनोद पाटील यांच्या वतीनेही पुष्पवृष्टी करण्यात आली
नियोजित कार्यक्रम दोन वाजता होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो 3 वाजून 55 मिनिटांनी पार पडला संपूर्ण गावावर हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातली नंतर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली
यावेळी भाविनिमगाव परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण ,झाले होते भाविनिमगावकरांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या व शिवभक्तांनी आर आर फौडेशन संचलीत विनोद पाटील यांचे आभार व्यक्त केले