पोखरी सेवा सोसायटी चेअरमन पदी लक्ष्मण आहेर तर व्हा.चेअरमन पदी ज्ञानदेव पवार !

शिवसेना नेते सभापती काशिनाथ दाते यांनी केला सत्कार
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व १३५२ सभासद असलेल्या पोखरी सेवा सोसायटीची निवडणूक एक महिन्यापूर्वी पार पडली होती शिवसेना नेते बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांना मानणारे सर्व १३ संचालक निवडून आले होते व या सोसायटीवर शिवसेनेने वर्चस्व कायम राखले होते.
बुधवार दिनांक २९ जून २०२२ रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडील अधिसूचना प्रमाणे पोखरी विकास सहकारी सोसायटी चेअरमन व व्हाईट चेअरमन यांची निवड मा. गणेश औटी सहाय्यक निबंधक पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली दु. ५ वा. पारनेर येथे निबंधक कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी संस्थेच्या चेअरमन पदासाठी लक्ष्मण कारभारी आहेर व व्हा चेअरमन पदासाठी ज्ञानदेव गोविंद पवार यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले व इतर कोणताही अर्ज न आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. लक्ष्मण कारभारी आहेर यांना सुचक बाबासाहेब एकनाथ रोकडे व अनुमोदक जयश्री मधुकर शिंदे होते तर ज्ञानदेव गोविंद पवार यांना सुचक बाबाजी निवृत्ती खैरे व अनुमोदक रमेश पांडुरंग कारंडे हे होते.
यावेळी संचालक भाऊ दरेकर, बाळासाहेब कोकाटे, महादू पवार, दत्ता आहेर, सावकार गुंजाळ, बाबासाहेब रोकडे, भीमबाई पवार, जयश्री शिंदे, बाबाजी खैरे, उमेश कारंडे, पिराजी कारंडे उपस्थित होते
पोखरी सेवा सोसायटी चेअरमन पदी लक्ष्मण आहेर तर व्हा.चेअरमन पदी ज्ञानदेव पवार !
यावेळी पोखरी सरपंच सतीश पवार, वारणवाडी सरपंच संतोष मोरे, उपसरपंच परसराम शेलार, माजी सरपंच सोपान फरतारे, तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास शिंदे, मा. उपसरपंच भाऊसाहेब आहेर, रंगनाथ दाते, तुकाराम दरेकर, बाबाजी आहेर, गोविंद आग्रे, संतोष गुंजाळ, बाळू गुंजाळ,मा. उपसरपंच सुभाष करंजेकर, ग्रा.सदस्य संजय काशिद, मा.चेअरमन संपत आहेर, मा.चेअरमन अण्णासाहेब पवार, ग्राम. सदस्य अशोक खैरे, ग्रा.सदस्य सिताराम केदार, ग्रा.सदस्य राहुल केदार,सूर्यभान वाकळे सर, पंढरीनाथ खैरे, नारायण खैरे, मा.चेअरमन राजू खैरे मेजर, कुंडलिक वाकळे, आण्णा दरेकर,आण्णा खैरे, पंडित खैरे, निजाम पटेल, यादव फरतारे, शेखर काशिद, सुभाष शिंदे शाखाप्रमुख,बाबा शिंदे, नितीन पवार, दिलीप पवार, पिराजी दरेकर,दत्ता वाकळे, रामदास शिंदे,शाम खैरे,प्रताप खैरे,माणिकशेठ गांधी,संजय खैरे,निलेश पवार,बाजीराव पानमंद, रेवन पवार,सुरेश गुंजाळ, म्हतु मधे,विठ्ठल फरतारे, आनंदा केदार,कैलास केदार, शांताराम आहेर,दारकू डेरे, एकनाथ पवार, गंगाधर पवार, संतोष आहेर, किरण आहेर,अर्जुन गाजरे, महादू आहेर,अशोक पिंगळे,अर्जुन पिंगळे, तुकाराम कारंडे, कांतीलाल मोरे,राजू काळे,दिलीप डोमाले,दत्ता काळे,विकास हांडे, केशव मोरे,भाऊसाहेब गुंजाळ, बाळासाहेब कारंडे,बबन कारंडे, पांडुरंग हांडे,सुभाष गणपत आहेर, प्रभाकर आहेर,जाणकू दुधवडे, झुंबर दुधवडे, भाऊ दुधवडे, पोपट वाघ, भाऊसाहेब गुंजाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.