
दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथून 20 वर्षाची तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे
याबाबत सोनई पोलीस स्टेशन मध्ये तरुणी बेपत्ता झाल्याबाबत मुलीचे वडील जवाहर लाल सय्यद रा अकोला ता पाथर्डी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे सदर मुलगी ही पाथर्डी तालुक्यातील असून दोरी व काठी चे कसरतीचे खेळ करणारे कुटुंबातील ही तरुणी आहे या व्यवसाया निमित्ताने माका येथे गेल्या काही दिवसापूर्वी आले होते माका येथे ते आपल्या कुटुंबा सह मुक्कामी थांबले होते यादरम्यान तिचे आईने काही तिच्या समवेत काही ठिकाणी गोधडी शिवण्याचे काम केले त्यानंतर ते घरी आल्यानंतर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बाजारातून खाऊ घेऊन येते असे सांगून राहुटी तुन बाहेर पडली त्यानंतर ती घरी आलीच नाही सदर तरुणीच्या लग्नासाठी चार ते पाच जणांनी मागणी घातली होती मात्र मुलीच्या वडिलांनी पाहू करू असे सांगितल्याने या मुलीला फूस लावून पळवून
नेले असल्याची शंका उपस्थित केली जात आहे सोनई पोलीस या घटनेचा तपास करत आहे