डाॕ. डी.वाय.पाटील महाविद्यालयात शिव जयंती साजरी .

पुणे दि १९
डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे व गडकिल्ले छायाचित्रे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. डी. पाटील , सचिव डॉ. सोमनाथ दादा पाटील, प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डाॕ. पी. डी. पाटील , विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव खजिनदार यशराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सप्ताहात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील हा एक उपक्रम. शिवव्याख्याते व गिर्यारोहक श्री. श्रीकांत कासट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यमध्ये गडकिल्यांचे काय महत्त्व होते तसेच प्रत्येक गड बांधण्यामागे महाराजाची भूमिका या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल त्यांनी बांधलेल्या किल्यांना भेटी देणे महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. जयसिंग सहाने यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा घेतला. प्रास्ताविकात डाॕ. विजय गाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमाचा हेतू आणि उद्देश सांगितला. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आपल्या अध्यक्षिय छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराजांचे राजे फक्त भूगोल नव्हता तर रयतेच्या मनातील राज्य होते असे मत मांडले.
व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर श्री. श्रीकांत कासट व जयसिंग सहाने यांच्या माध्यमातून महाविद्यालयात भरवण्यात आलेल्या गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शनाचे उद् घाटन प्राचार्य व प्रमुख पाहुणे यांनी केले. या प्रदर्शनात अनेक गडकिल्ल्यांचे छायाचित्रे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रत्यक्षात पाहावयास मिळाले. व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख यांनी केले तर आभार प्रा. गणेश फुंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रा. डाॕ.मुकेश तिवारी, प्रा.डाॕ. मिनल भोसले, प्रा. खलिद शेख, प्रा. सतिश ठाकर व सर्व प्राध्यपक यांनी पार पाडली.
कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
