कोकणकड्याचा सनसेट पाॅईंट देतोय सापुता-याची आठवण !

संजय महानोर
भंडारदरा प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यांची चेरांपंजी म्हणुन प्रसिद्ध असणा-या घाटघरच्या घाटणदेवीच्या कोकणकड्याचा सनसेट पाॅईंट सापुता-याची आठवण करुन देणारा ठरत असल्यामुळे भंडारद-याच्या वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात पर्यटनासांठी पर्यटकांना आता सापुता-याला जाण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया अनेक निसर्ग प्रेमी देऊ लागले आहेत.
अकोले तालुक्यातील भंडारदरा परीसरातील घाटघर म्हणजे सर्वात जास्त पर्जन्यमान असणारे ठिकाण समजले जात असुन या ठिकाणाला अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजली जाते .डोंगरद-याचा भाग असल्यामुळे निसर्गाचा ठेवा या घाटघरला भरभरुन निसर्गानेच बहाल केलाय . एका बाजुला हिवाळा धबधबा उंचावरुन कोकणात कोसळत वाहत जातोय तर दुस-या बाजुला टुमदार ज॔गली जनावरांसाठी वाघतळं नावाचं तळं सुद्धा ठाण मांडुन बसल्यासारखं वाटतय..या परीसरामध्ये दोन कोकणकडे असुन घाटणदेवीचा कोकणकडा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या कोकणकड्यावरुन मावळता सुर्य पाहणे अतिशय मनमोहक ठरत असुन पर्यटक तासंनतास घाटणदेवीच्या कोकणकड्यावर रेंगाळु लागली आहेत . येथील सनसेट पाॅईंट हा सापुता-याची आठवण करुन देणारा ठरत असल्याकारणाने भंडारद-याच्या अभयारण्यात साक्षात सापुतारा अवतरल्याचे जाणवत असल्यांची प्रतिक्रिया भंडारद-याच्या प्रेमात पडलेली पर्यटक देऊ लागल्याने पर्यटकांची पावले घाटघरच्या दिशेने आपोआप झुकायला लागली आहेत . घाटणदेवीच्या कोकणकड्यावर वन्यजीव विभागाकडुन आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असुन पर्यटकांना सनसटेचा मनमोकळे पणाने आनंद घेता यावा म्हणुन सिंमेंटची रंगीबेरंगी बाकडेही कोकणकड्याच्या आसपास वन्यजीव विभागाच्या प्रयत्नातून दिसु लागली आहेत .कोकणकड्याच्या उजव्या हाताला अंलंग , कुलंग व मलंग गड असुन पर्यटक आता या गडासह सेल्फी घेताना दिसुन येत आहेत .
घाटणदेवीचा हा कोकणकडा म्हणजे भविष्यातील शहापुर ते भंडारदरा हा राजमार्ग ठरणार असुन सध्या याच घाटणदेवीच्या वाघ पायवाटेने पाळीव जनावरे पावसाळ्यात कोकणात चरण्यासाठी उतरतात व दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी गुराखी परत याच मार्गाने आपल्या वस्तीला घाटघरकडे येतात .काही दिवसापुर्वी अकोले तालुका लोकप्रतिनिधीसुद्धा याच मार्गे खाली कोकणात उतरत पर्यायी रस्त्याची पाहणी केली होती .



आणखी एक विशेष म्हणजे या घाटणदेवीच्या कोकणकड्यावर आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले घाटणदेवीचे मंदीर असुन याठिकाणी नवरात्रात घटस्थापना केली जाते .अर्थात भंडारद-याच्या या अभयारण्यात सापुतारा उभा करण्याचा छानसा प्रयत्न केलाय तो वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी त्यांच्या या प्रयत्नाला तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे ती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे व . घाटणदेवीच्या सनसेट पाॅईंटची विशेष काळजी घेणारे वनपाल भास्कर मुठे व त्यांच्या युनिटचे कर्मचारी महिंद्रा पाटील यांनी