विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे — ज्ञानेश्वर आवारी

….. राजुर प्रतिनिधी…
…विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे त्याच्यावर जबरदस्ती करू नये असे आव्हान अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील विठे गावचे वारकरी संप्रदायातील व मुंबई येथे पोलीस अधिकारी असलेले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर आवारी यांनी मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ सोहळ्यात बोलताना व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त तथा सचिव एम एम भवारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यालयाचे माजी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉक्टर विश्वास आरोटे महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते माजी विद्यार्थी दिपक बोऱ्हाडे .आदिवासी उन्नती सेवा मंडळाची खजिनदार माधव गभाले विद्यालयाचे प्राचार्य कैलास तेलोरे सेवानिवृत्त शिक्षक विजय खिलारी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पाबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते……. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कैलास तेलोरे यांनी विद्यालयाची वार्षिक व सुरू असलेली वाटचाल याबद्दल सर्व माहिती या ठिकाणी सांगितले तर संस्थेचे विश्वस्त एम एम भवानी यांनी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण भागात शाळा वस्तीगुह चालू करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमी पुढाकार घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी देखील या शाळेतून जात असताना आपले करिअर घडवत असताना ज्या ठिकाणी आपल्याला आवड आहे त्या ठिकाणीच आपले करिअर घडवावे मागील शिक्षण व आत्ताच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी आता फायदा घेतला पाहिजे असे मत एम एम भवारी यांनी बोलताना सांगितले……… तर राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर आभारी यांनी विद्यार्थ्यांना आपण पुढे जात आहोत पुढे जात असताना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडत असताना आपल्याला अभ्यासासाठी मोठा वेळ आहे आमच्या काळात वेळ नव्हता इतर कामे देखील आम्हाला करावी लागत होती मात्र आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे अभ्यासाकडे लक्ष द्या जो पेपर अवघड जाईल त्याबाबत विचार करू नका नवीन विषयाकडे लक्ष द्या नवीन विषयात आपण चांगले मार्गक्रमण करू शकतो आरोग्य… शिक्षण ….हे महत्त्वाचे घटक असून याकडे आपण लक्ष द्या आपल्या शिक्षकांनी आपल्याला घडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे त्या शिक्षकांना आपण विसरू नका दहावी हे आपल्या आयुष्यातील यु टर्न महत्त्वाचा आहे हा टर्न घेताना अतिशय जपून विचार करून घेतला पाहिजे असे मत राष्ट्रपती पुरस्कार विजेते न्यानेश्वर आवारी यांनी व्यक्त केले तर माजी विद्यार्थी विनायक बोराडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना शिक्षकांविषयी व शाळेविषयी नेहमी आपल्यामध्ये आदर्श व्हा असा संकल्प दिला तर माजी विद्यार्थी डॉक्टर विश्वास आरोटे यांनी बोलताना सांगितले की शिस्त ही जीवनाला महत्त्वाची आहे शिक्षकांनी मारले म्हणून त्यांच्यावर राग धरू नका रागावर नियंत्रण ठेवा मार खाल्ल्याशिवाय विद्यार्थी घडत नाही पालकांनी देखील शिक्षकाने मारल्यानंतर त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करावी आपला विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत कोरोनाच्या काळामध्ये पालकांना विद्यार्थी घरी आल्यानंतर किती त्रास व्हायचा मात्र 365 दिवस हा शिक्षक या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी रक्ताचे पाणी करतो विद्यालयाची निकालाची गुणवत्ता व विद्यार्थी घडवत असताना त्याला सर्व विषयात कसे पुढे जाता येईल यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे पालकांनी देखील विद्यार्थ्यांना मारहाण झाली तर तक्रारी करू नये असे आव्हान करत विद्यार्थ्यांनी दहावीतून निरोप घेत असताना ज्या ठिकाणी आपण भविष्यात काम कराल त्या ठिकाणी आपल्या शाळेसाठी एक रुपया मदतीचा द्यावा असे आव्हान त्यांनी केले यावेळी विद्यालयाच्या वतीने सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला… तर यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका गौरी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर उत्तम माणूस म्हणून जगा नम्रता ही प्रत्येकाने मनात ठेवा भिंत तोडणे सोपे आहे पूल जोडणे अवघड आहे आई-वडील यांनी जे स्वप्न पाहिले आहे ते स्वप्न साकार करा नम्रता जीवनात यशस्वी करू शकते असे सांगितले तरी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कैलास तेलोरे यांनी केले तर सूत्रसंचालन राम पवार यांनी तर आभार प्रदर्शन ज्योती वर्पे यांनी मानले यावेळी रामनाथ भालचिम रमेश आरोटे विजय चौधरी अनिता खताळ विजय जोशी संदीप लगड आदींनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले तर कार्यक्रमाच्या सांगते नंतर भोजन देऊन सांगता झाली..