पाथर्डी तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
:पाथर्डी तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याचे औचित्य साधत पाथर्डी पंचायत समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी पाथर्डी तालुक्या मध्ये ठीक ठिकाणी शिवजयंती रांगोळ्या, लेझीम, ढोल-ताशाच्या गजरामध्ये व शिवाजी महाराजांच्या घोषणा देत जयंती उत्सव साजरा करण्यात आले या वेळी शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे व व शिव गीतांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले
यावेळी पंचायत समिती सभापती सूनिता दौंड, उपसभापती मनीषा वायकर, तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लांडगे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, धनंजय बडे, अमोल गर्जे, अजय भंडारी, नगराध्यक्ष मृत्युंजय गजेऺ, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, शिवसेनेचे भगवान दराडे, सुभाष केकान, सुनील ओव्हळ, एकनाथ आटकर, विस्तारअधिकारी प्रशांत तोरवणे, बजरंग घोडके, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, महेश बोरुडे, प्रवीण राजगुरू, सचिन वायकर, सचिन पालवे, नारायण पालवे आदी पंचायत समितीतील व तहसील कार्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद शिवप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते