अहमदनगर
शिवरायाचे जीवनचरित्र आदर्श जीवन जगण्याची उर्मी देते- विठ्ठल आढाव

भायगाव येथें शिवजयंती साजरी!
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अनेंक जाती धर्माच्या लोकांना एकाच धाग्यात विणुन स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायाचे जीवनचरित्र सर्वानाच आदर्श जीव जगण्याची उर्मी देते.कारण महाराजांनी मनानी खचलेल्या मेलेल्या माणासांना मध्ये प्राण फुंकून नवचैतन्य निर्माण केले.
असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टीचे युवा नेते विठ्ठलराव आढाव यांनी केले.
शेवगाव- नेवासा राजमार्गा वरील भायगाव येथील नवनाथ बाबा मंदिराच्या सभागृहात आयोजित सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारा आदर्श राजा म्हणुन उभ्या महाराष्ट्रचं दैवत समजल्या जाणाऱ्या राजाने शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम केले. म्हणुनच महाराजांना जाणता राजा म्हणून संबोधले जाते. अंधश्रध्देला थोडाही थारा न देणाऱ्यां महाराजांनी स्त्रीयांना सन्मानांची वागणुक दिली. महाराजांच्या कार्यपध्दतीची साक्ष आजही गडकिल्ले देतात.
यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. सागर चव्हाण, विठ्ठल रमेश आढाव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष आढाव, डॉ. महेश दुकळे, कानिफनाथ घाडगे, ज्ञानेश्वर गर्जे, पांडुरंग नेव्हल, अभिजीत पांडुरंग आढाव, ज्ञानेश्वर लोढे,अजित आढाव, अजिनाथ आगळे,कृष्णा डमाळे, योगेश शेळके , मयुर शहाणे, धनंजय आवारे, रोहित खाटिक, ऋषीकेश नेव्हल, कडुबाळ आढाव, सतिष आढाव, योगेश शेळके, ज्ञानेश्वर लोखंडे, ओंकार दुकळे, अभिजित शिवाजी आढाव, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह युवक व ग्रामस्थ मोठया संख्येने होते
भायगाव शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
जिल्हा परिषद डिजिटल शाळा भायगावमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका कृष्णाताई उंदरे, याच्या हस्ते शिवरायाचे पुजन करून विदयार्थानां मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेचे सहशिक्षक रोहिणीताई साबळे, भाऊसाहेब माळवदे, अर्चना महानुर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.