सोनईत ठिक ठिकाणी शिवजयंती उत्सहात साजरी!

सोनई –छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोनई परिसरात आज ठीक ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.
तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थळी विधिवत पूजा ,अभिषेक करून रयतेच्या राजाला मानवंदना दिली.
शिवाजी चौकात, ग्रामपंचायत, सोनई सेवा सोसायटी,स्वामी विवेकानंद चौक, कागोणी वेस,शनी शिंगणापूर, संभाजी चौक, मुळा कारखाना ,पाणसवाडी रोड, माधावबाबा चौक,आदी ठिकाणी भगवेमय वातावरणात जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येकांनी आपापल्या वाहनावर भगवे झेंडे लावले होते. आतिषबाजीही करण्यात आली.विशेष मुस्लिम समाजबांधव यांनी सहभाग घेतला.
यामध्ये युवा नेते उदयन गडाख,ह.भ.प.विश्वसराव गडाख, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख,जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक साळवे,डॉ. माऊली दरदले,सरपंच धनंजय वाघ,मा.सरपंच राजेंद्र बोरुडे,ग्रा.प.सदस्य सखाराम राशीनकर,उपसरपंच प्रसाद हरकळे,डॉ. बडे ,माजी सरपंच आंबदास राऊत,सह अनेक शिवप्रेमी सहभागी झाले होते.
पोलीस प्रशासन च्या वतीने स.पो.नि.सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहयाक फौजदार संजय चव्हाण,स.पो.नि,मिसाळ, स.पो.नि.गिरी मॅडम, पो.कॉ.प्रवीण आव्हाड,बाबा वाघमोडे,पो.कॉ. गर्जे, पो.कॉ. चौरे,पो.कॉ.आघाव, पो.कॉ.सीत्रे, पो.कॉ.मूळे,आदींनी गावात ,परीसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
