
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील प्रगतशिल शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागुजी उर्फ मारूतराव जाधव यांचे आज दुपारी १ वाजुन ३० मिनिटांनी निधन झाले. मृत्युसमयी ते ८४ वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता जाधव वस्ती बक्तरपुर येथे होणार आहे.
लोकनेते मारूतराव घुले पाटील यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे भागुजी उर्फ मारूतराव जाधव यांनी बक्तरपुर -मजलेशहर विविध कार्यकारी संस्थेचे २० वर्ष चेअरमन म्हणुन काम पाहिले. भैरवनाथ पाणी वापर संस्थेचे ते अदयप्रर्वतक होते. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये ते धार्मिक ग्रंथ पारायण करून संत पुजनाचा कार्यक्रम करत असत. त्यामध्ये राजकिय मंडळीची हजेरी लाक्षणिक आसायची. प्रत्येकांशी हसुन बोलण्याच्या त्यांच्या स्वभावामूळे वयोवृध्द ते तरूण अशा सर्वाशी मैत्रीचे त्यांचे नाते होते. ते सधन कुटुंबांतील असल्याने ते नेहमी सामान्य माणसाला अर्थिक हातभार लावण्यात मागेपुढे पहात नव्हते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावई, नातु, पणतु, असा मोठा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव बबनराव जाधव बक्तरपुर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे विदयमान चेअरमन आहेत. तर त्यांच्या थोरल्या कन्या सौ.मंदाकिनी शंकरराव बेडके बक्तरपुर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत. शेवगाव येथील अर्थव हॉस्पीटलचे डॉ. विकास बेडके व राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल बेडके यांचे ते आजोबा होते.