माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्याकडून लांडे कुटुंबाचे सांत्वन!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन जनार्दन रेणकु लांडे यांचे जेष्ठ चिंरजीव अशोक लांडे यांचे नेवासा तालुक्यातील देवगाव परिसरात अपघाती निधन झाले. अशोक लांडे हे तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यामध्ये शेतकी विभागाकडे नोकरी करत होते. तालुक्यातील आनेक भागात त्यांनी काम केले.अतिशय हुशार जनमाणसातील अधिकारी म्हणुन ते पारिचित होते. त्याच्या विषयी अधिकारी वर्गासह शेतकरी वर्गात आपुलकिची भावना होती. त्याच्या अकाली निधनाने मनाला दुःख वाटते. अशा शब्दांत शेवगाव – पाथर्डी मतदार संघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी लांडे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी माजी सरपंच संजय लांडे, राष्ट्रवादीचे युवा नेते विठ्ठलराव आढाव, अनिल लांडे, प्रगतशिल शेतकरी विठ्ठल रमेश आढाव, गोरक्षनाथ भोगे, बाळासाहेब लांडे, विकास घाडगे, ओंकार लांडे, राम लांडे, यांच्यासह लांडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.