अहमदनगर
अकोले सेवा सोसायटी चेअरमन पदी वसंतराव धुमाळ तर व्हाईस चेअरमन पदी रंजना मंडलीक यांची निवड!

प्रवरा पतसंस्थेकडून नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार
अकोले प्रतिनिधी
अकोले विकास सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी वसंतराव सयाजी धुमाळ यांची तर व्हा चेअरमन पदी सौ रंजना राजेंद्र मंडलिक यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली
अकोले विकास सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अकोले येथील प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रवरा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन व राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलचे अकोले तालुका अध्यक्ष भास्करराव मंडलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी संस्थेचे संचालक व अगस्ती कारखान्याचे संचालक बाळासाहेब ताजणे प्रवरा पतसंस्थेचे संचालक हिम्मतराव मोहिते ,संचालिका मनीषा ताजने संस्थेचे सर्व संचालक,व्यवस्थापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.