ग्रामीण

सरस्वती पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात असलेले सरस्वती पब्लिक स्कूल भालगाव येथे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची (३९२)वी जयंती साजरी करण्यात आली .यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री अशोक खरमाटे सर होते .
शिवाजी महाराजांचा इतिहास हा देदीप्यमान आहे.महाराजांनी स्वतःच राज्य म्हणजे स्वराज्य स्वतः निर्माण केले.या स्वराज्याचा कारभार अतिशय सुंदर आणि रयतेच्या कल्याणकरिता केला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जागे ठेवणं हीच खरी काळाची गरज आहे .जीवनाची लढाई लढत असतांना आपल्याला वैचारिक अधिष्ठान गरजेचे आहे .म्हणून शिवरायांच्या विचारांचं आचरण आपण सर्वांनी करनं हीच खरी शिवजयंती आहे .असे प्रतिपादन यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना श्री अशोक खरमाटे सर यांनी केले .यावेळी मुख्याध्यापक श्री अशोक सुपेकर सर ,शिक्षक कर्मचारी सोनवणे सर,रोकडे सर,होरणे सर,वडते सर,शेंडगे सर,सय्यद सर,जायभाये सर ,खरमाटे मॅडम,सोनवणे मॅडम,जायभाये मॅडम,खेडकर मॅडम,डमाळे मॅडम,मुळे मॅडम,शिक्षकेतर कर्मचारी शहाणे सह आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थी वैष्णवी खरमाटे, वैष्णवी खेडकर,तेजस्विनी खेडकर,सोनाली खेडकर,श्रुती खेडकर,प्रतीक्षा खेडकर,तनिष्का ढाकणे,तनिष्का सुपेकर,वैशाली सुपेकर,साक्षी सुपेकर, अक्षरा फुंदे, सुरज घाटे,अजित कासुळे,हर्षवर्धन खरमाटे,सार्थक जरांगे ,वेदांत खेडकर,सह आदी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या प्रति असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या .
सूत्रसंचालन प्रतीक्षा सुपेकर हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button