सत्यनिकेतन संस्थेत गुणवंत क्रिडापटूंचा सत्कार समारंभ संपन्न.

राजूर /प्रतिनिधी –
वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही त्यामुळे कायम तयारीत रहा.जिवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका.पळायचेच असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा.त्यासाठी कष्ट घ्या,कारण कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात.असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख यांनी केले.

अकोले तालुक्यातील राजुर येथील सत्यनिकेतन संस्थेत संस्थेच्या विदयालयातील गुणवंत क्रिडापटूंचा सत्कार समारंभ सत्यनिकेतन संस्थेच्या अॅड.एम.एन.देशमुख महाविदयालयातील सहा खेळाडूंची राष्ट्रीय व विभागीय स्तरावर कुस्तीसाठी निवड झाली.सर्वोदय विदया मंदिर खिरविरे येथील तेरा खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली. गुरूवर्य रा.वी.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर राजुर येथील सव्विस खेळाडूंची व दोन कब्बड्डी संघ, पाच हॉलीबॉल संघांची जिल्हास्तरावर निवड झाली.डॉ.राजेंद्र प्रसाद अनुदानीत आश्रमशाळा शेणित येथील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली. या गुणवंत क्रिडापटूंचा सत्कार समारंभाचे आयोजन सत्यनिकेतन संस्थेने केले होते.
याप्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,मारूती मुठे, प्रकाश महाले,श्रीराम पन्हाळे,रामजी काठे,चिमणजी देशमुख,नंदकिशोर बेल्हेकर,माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर,विजय पवार,मुळे मॅडम,प्राचार्य डॉ.बि.वाय.देशमुख,मनोहर लेंडे,लहानु पर्बत,उपप्राचार्य बादशहा ताजणे,भाऊसाहेब बनकर,संपत धुमाळ यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते.
