इतर
संविधानाचा अवमान करणाऱ्या परभणीतील त्या आरोपीवर कठोर कारवाई करा – विजय पवार

अकोले प्रतिनिधी
संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे
अकोले तालुका (युवक) अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान कोणीही खपवून घेणार नाही. शासन /प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन यापुढे अशा घटना घडणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा गावोगावातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे श्री विजय पवार यांनी म्हटले आहे