आमदार लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा कडून गणोरे येथे विविध उपक्रम

गणोरे प्रतिनिधी :
अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे विविध प्रकारच्या उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
वसुंधरा प्रतिष्ठान आयोजित गणोरे येथे विविध उपक्रमांची सुरुवात आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आली. आमदार साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी तरुणांनी आणि ग्रामस्थांनी 56 रक्त दात्यांनी रक्तदान केले. तसेच वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे वाढदिवसाच्या निमित्ताने यावर्षी पासून ” चला वसुंधरा हिरवाईने नटवू या…” या सदराखाली गावातील जे जे व्यक्ती चिंच, वड, पिंपळ या वृक्षांची मागणी करतील आणि ती वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतील त्या वृक्षांची रीतसर वन विभाग यांच्या कडे नोंद करतील अशा सर्व मागणी धारकांना वृक्ष वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणार आहे असे प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले आणि या उपक्रमाचा शुभारंभ आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील पाच नागरिकांना आमदार साहेब यांच्या हस्तेवृक्ष देण्यात आले.
वसुंधरा प्रतिष्ठान आयोजित आमदार साहेबांचा जन्मदिन आणि रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.या संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार डॉ किरण लहमटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे वाढदिवसाच्या निमित्ताने यावर्षी पासून “वसुंधरा हिरवाईने नटवू या…” तसेच वैकुंठ रथाचे उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.ह्या उपक्रमासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गणोरे गावांनी माझ्यावर भरभरून प्रेम पुन्हा एकदा सिद्ध केले.त्यातून त्यातून उतराई होण्यासाठी गावाला जवळपास एक कोटी रुपयांचा भरीव निधी दिला. वसुंधरा प्रतिष्ठान ला पुढील वाटचालीस मनापासुन शुभेच्छा दिल्या.तसेच या पुढे ही प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमात सहभागी होत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी आर के उगले तसेच युवा नेते विकास शेटे,ग्रामपंचायत सदस्या सौ कुसुम चव्हाण ,शुभम आंबरे,यांनी मनोगत व्यक्त केले आणि प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस मनापासुन शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांचा प्रतिष्ठानने केक कापून आणि नवीन अभियान सुरू करून वाढदिवस साजरा केला. त्यांच्या सोबत अंकुश वैद्य, भानुदास तिकांडे, आर के उगले,विकास शेटे तुकाराम गोरडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
गणोरे गावचे सरपंच श्री संतोष आंबरे,उपसरपंच प्रदिप भालेराव,ग्रामपंचायत सदस्य श्री पोपटराव आहेर, रावसाहेब आहेर,प्रताप आंबरे, सौ साधना आंबरे,सुरेखा भालेराव,कुसुम चव्हाण, चेअरमन श्री अशोक आहेर, श्री के.के. आहेर,आंबादास दातीर, बाळासाहेब आंबरे,भाऊसाहेब आंबरे, अविनाश आहेर,बापू आंबरे, सोमा आहेर,बाळासाहेब खतोडे,बाबासाहेब आहेर,राजेंद्र आहेर,अक्षय गाडेकर, राहुल खतोडे,शुभम आंबरे,प्रकाश भालेराव,योगेश आंबरे,गणेश आहेर,गणेश दातीर्,सुभाष आहेर, आदि मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान अध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री विवेक मच्छिंद्र आंबरे, उपाध्यक्ष भाऊ आंबरे, सचिव सुशांत आरोटे, सर्व श्री सदस्य शुभम आंबरे,राजेंद्र वालझाडे,संजय आंबरे,बाळासाहेब आंबरे,भाऊसाहेब आंबरे, पोपट आहेर,प्रकाश भालेराव,आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री सुशांत आरोटे यांनी केले,पाहुण्यांचे स्वागत विवेक आंबरे तसेच आभार श्री राजेन्द्र वालझाडे यांनी मानले