अहमदनगर

महाशिवरात्री च्या दिवशीही कांदा लिलाव सुरूच !


अकोले /प्रतिनिधी :         
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये  मंगळवार दिनांक 01/03/2022 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी ही कांदा लिलाव नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण आभळे यांनी दिली सर्व कांदा उत्पादक शेतक-यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे
अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळनेसाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आणावा व कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी बाजार समितिचे आवारात आनावा.
बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button