माता आणि मातृभूमी चा विसर पडू देऊ नका–पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी येथील सहज अभ्यासिका मधील अभ्यास परीपूर्ण करून पाच विद्यार्थी पोलीस दलामध्ये निवड झाली निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार समारंभ सहज अभ्यासिका मध्ये आयोजित करण्यात आला यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
यावेळी बोलताना प्रवीण पाटील म्हणाले की आपल्या माता आणि मातृभूमी चा विसर पडू देऊ नका कारण कोणत्याही , यशाला शॉर्टकट नसतो यश हे परिश्रम सचोटी व सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या सहाय्याने मिळते असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण म्हणाले
या वेळी ज्ञानदेव कराड संचलित सहज अभ्यासिका पाथर्डी येथील दीपक खोजे, विकास खोर्दे, वासुदेव जामदार, गणेश खेडकर, योगेश बेळगे या यशस्वी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र मुंबई पोलीस व सीआरपीएफ मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान अभय काका आव्हाड यांना देण्यात आले होते
सहज अभ्यासिका येथे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात व अभ्यासात परिपूर्ण होऊन वेगवेगळ्या ठिकाणी उच्च ध्येय गाठतात.
या कार्यक्रमासाठी शिक्षक नेते रामप्रसाद आव्हाड, विष्णू बांगर, संतोष पालवे, अनिल कराड, अण्णा आंधळे, शशिकांत जायभाये, तसेच समृद्धी अर्बनचे अनंत सानप आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते याप्रसंगी रामप्रसाद आव्हाड, अभय काका आव्हाड, विकास खोर्दे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या . यावेळी आरिफ बेग सर यांनी प्रास्तविक केले व आभार सविता कराड यांनी मानले.