मिडसांगवीचा शुभम ठोंबरे चित्रकला स्पर्धेत तृतीय

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी बीडच्या बॉर्डर ला असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात शेवटच्या टोकाचे गाव असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अत्यंत गरीब कुटुंबातील शुभम लक्ष्मण ठोंबरे यांने चित्रकला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला
एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात जि. प.प्रा.शाळा मिडसांगवी (ता.पाथर्डी) चा इ.सातवीचा विद्यार्थी शुभम लक्ष्मण ठोंबरे याने तिसरा क्रमांक मिळवला.बीड व अहमदनगर जिल्ह्यातील ५५० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. शुभमने रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राला परीक्षकांनी दाद दिली. शिरूर कासार जि.बीडचे तहसीलदार श्रीराम बेंडे, सिद्धेश्वर संस्थानचे महंत ह.भ.प.विवेकानंद शास्त्री महाराज यांच्या हस्ते शिरूर कासार (जि.बीड) येथे सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.जि.प.प्रा.शाळा मिडसांगवीचे मुख्याध्यापक बाळासाहेब घोंगडे, वर्गशिक्षक ज्ञानेश्वर वाघ,कल्याण कराड, व्यंगचित्रकार दीपक महाले,बंकटस्वामी बडे,वाल्मीक बडे,कानडे मॅडम, खेडकर मॅडम,भिमप्रसाद जोशी, कीरण अंदुरे,अमोल गुंजकर यांचे शुभमला मार्गदर्शन लाभले.शुभमच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.