आंभोळ येथे मोफत ई श्रम कार्ड मेळावा!

अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील अंभोळ गावात काल मोफत मनी वाईज मेळावा संपन्न
अंभोळ या ठिकाणी भारतीय रिझर्व बँक , बँक ऑफ महाराष्ट्र व क्रिसील फाउंडेशन ( crisil ) विद्यामाने मनी वाईज साक्षरता केंद्र योजनेचा मेळावा अंतर्गत डाक विभागाच्या ई श्रम कार्ड मेळावा घेण्यात आला
यावेळेस अंभोळ, महादेववाडी, पैठण या गावातील लोकांनी मनी वाईज या मेळाव्यात आधार कार्ड, पॅन कार्ड , ई श्रम कार्ड काढण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते
तसेच मनी वाईज मेळाव्यामध्ये नागरिकांना मोफत ई श्रम कार्ड काढून देण्यात आले व लोकांना ई श्रम कार्ड चे फायदे सांगण्यात आले
या प्रसंगी डाक विभागाचे अधिकारी भारत राऊत, सतीश बापट , अमोल भागवत, जयराम बालचित्र, मधुकर गोडे , निकिता आंबेडकर , भाऊसाहेब कांबळे ,
यांनी डाक विभागाच्या विविध योजना लोकांना समजून सांगितल्या
तसेच अंभोळ गावचे सरपंच कोंडीबा वाजे, उपसरपंच नामदेव साबळे, तसेच ग्रामसेवक प्रवीण गावित हे उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले
तसेच या कार्यक्रमासाठी गावातील बचत गट प्रतिनिधी कविता साबळे ,नीलम चौधरी ,तसेच समन्वयक जिजा घोटकर मनी वाईज वित्तीय साक्षरता केंद्राचे व्यवस्थापक श्री राहुल बोर्डे यांनी मार्गदर्शन केले
