डॉ भांडकोळी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मोफत सर्वरोग निदान शिबीर

अकोले प्रतिनिधी
मेडीकव्हर हॉस्पिटल संगमनेर व डॉ.भांडकोळी यांचे हरिचंद्र मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व हरिचंद्र मेडिकल फाउंडेशन, ट्रायबल डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले शहरातील डॉ.भांडकोळी यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे
गुरुवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे मोफत सर्वरोग निदान शिबिर सुरू राहणार आहे अकोले शहरातील गडाख शोरूम समोर डॉ भांडकोळी यांच्या हॉस्पिटलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात मेंदू रोग तज्ञ डॉ.नहोश पाटील ,हृदयरोग तज्ञ डॉ.चेतन जैन पोटाचे व लिव्हर विकार तज्ञ डॉ सुदर्शन पाटील अस्थिरोग तज्ञ डॉ विजय पटेल, त्वचारोग व कॉस्मेटिक तज्ञ डॉ रिगीता पटेल, मूत्र विकार तज्ञ डॉ ऋषिकेश वाघोलीकर किडनी विकार तज्ञ डॉ अभिजीत मोरे नेत्ररोग तज्ञ डॉ संतोष पोखरकर आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतील नाव नोंदणीसाठी 9420032244, 73919919122, 9325889926 या दूरध्वनी वर सम्पर्क करावा. या मोफत सर्वरोग निदान शिबिराचा अकोले तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ एम.के. भांडकोळी ,डॉ.ज्योती भांडकोळी यांनी केले आहे
