प्राचार्य मनोहर लेंडे राष्ट्रीय समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित.

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे यांना राष्ट्रीय समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील मानव अधिकार सेवासंस्था देशातील शैक्षणिक,सामाजीक,सांस्कृतीक,राजकीय,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करत असते.
गेली तिन दशके १९९२ते २०२२ या कालखंडात प्राचार्य लेंडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.या कालावधीत सत्यनिकेत संस्था अंतर्गत खिरविरे,कातळापुर,राजूर विदयालयांमधील शैक्षणिक प्रवास हा वाखान्यायोग्य आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच सर्वांगीन विकासासाठी ते नेहमी प्रयत्नशिल आहेत.विदयार्थ्यांना चार भिंतीच्या आतील शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळने महत्वाचे असून ते नेहमीच गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशिल असतात.समाजप्रबोधनाचे काम ते करत आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय समाजसेवा रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
या पुरस्काराबद्दल राजूर विदयालयात त्यांचा सत्यनिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार, व्यवस्थापक प्रकाश महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे, प्रभारी उपप्राचार्य बादशहा ताजणे,शरद तुपविहिरे,कार्यालयीन अधीक्षक निवृत्ती आभाळे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय पगारे यांनी केले.सुत्रसंचालन सदाशिव गिरी यांनी केले तर महेश दिंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्राचार्य मनोहर लेंडे यांच्या सन्मानार्थ सत्यनिकेत संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन.कानवडे,मिलिंदशेठ उमराणी,कोषाध्यक्ष विवेक मदन, संचालक प्रकाश टाकळकर,मारूती मुठे,सुमनताई मुठे,अशोक मिस्त्री,प्रकाश शहा सर्व संचालक मंडळ, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक आदींनी अभिनंदन केले.व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.