अहमदनगर

भारजवाडी याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांचे (बालकवींचे) कवी संमेलन !

अशोक आव्हाड

पाथर्डी प्रतिनिधी

      नुकताच मराठी राजभाषा दिन होऊन गेला यानिमित्त जि.प.प्रा. शाळा हनुमाननगर (भारजवाडी) ता.पाथर्डी याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्थात बालकवींचे कवी संमेलन दि. ०५ मार्च २०२२रोजी दुपारी २:००ते ४:०० या वेळात पार पडले. हनुमाननगर (भारजवाडी), एकनाथवाडी,  नाथनगर,  हसनापूर, बेलगाव, शिंगणवाडी, गोपाळवाडी या शाळांमधील ३५ बालकवींनी कविसंमेलनात आपला सहभाग नोंदवला.
    बाल चिमुकल्यांच्या मनामध्ये अनेक विचार, भावना दडलेल्या असतात त्या भावना कवितेच्या, चारोळीच्या रूपाने बाहेर पडतात आणि आपल्यालाही खूप काही शिकवून जातात. चिमुकल्यांनी निसर्ग, पर्यावरण, झाड, पाऊस, जमीन, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, फुले, देश, सैनिक, आई-वडील, नातेसंबंध, मित्र अशा विविध विषयांवर अफलातून स्वरचित कविता सादर केल्या. कविता सादर करताना बालकवींचा उत्साह केवळ अवर्णनीय होता. बालकवींच्या कविता ऐकून स्वतःला अंतर्मुख व्हावं लागलं. प्रचंड आशावाद, कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव तसेच भविष्याबद्दलची भीती अशा विविध अंगांनी त्यांनी आपले चिंतन मांडलं. 
      बाल कविसंमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणून पाथर्डी येथील सुप्रसिध्द निसर्गकवी *श्री. सचिन चव्हाण सर* हे उपस्थित होते. त्यांनी लिहिलेल्या झाड, कोकिळा, आई यांसारख्या कवितांनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओल्या झाल्या. संमेलनाध्यक्ष सचिन चव्हाण सर यांनी कवितेचे महत्व, सादरीकरण करण्याच्या पद्धती, विषयाची निवड, कवितांचे प्रकार याबद्दल लहानग्यांना मार्गदर्शन केलं. बेलगाव, शिंगणवाडी व गोपाळवाडी या शाळांमधील बालकवी संमेलनासाठी व्हर्चुअली उपस्थित होते. अंतर जास्त असल्यामुळे त्यांना याठिकाणी येणं शक्य नव्हतं. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कविता त्यांनी प्रेक्षकांना ऐकवल्या व यु ट्युब लाईव्हच्या माध्यमातून बाल कवी संमेलनाचा लाभ घेतला.  
  स्वरचित प्रत्यक्ष कविता सादरीकरणात

प्रथम क्रमांक
सार्थक पांडुरंग बटुळे ३री (हनुमाननगर.)

द्वितीय क्रमांक (विभागून)
१) वैष्णवी नामदेव डोंगरे ७वी (एकनाथवाडी)
२) तेजस आजिनाथ जवरे ४थी (हनुमाननगर)

तृतीय क्रमांक
प्रतीक्षा मल्हारी बटुळे ३री (हनुमाननगर)
या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले तर व्हर्चुअली सादरीकरणात

प्रथम क्रमांक
सार्थक भास्कर रपकाळ ४थी (शिंगणवाडी)

द्वितीय क्रमांक
जान्हवी ईश्वर गायकवाड २री (गोपाळवाडी)

तृतीय क्रमांक
भक्ती अशोक पोकळे ४थी (बेलगाव)
या कवींनी बाजी मारली.

    बाल कवी संमेलनाचे सूत्रसंचालन साहित्यप्रेमी शिक्षक श्री.विनायक सुरसे सर यांनी केले. क्रमांक पटकावणाऱ्या बालकवींना भगवानगड प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार कृष्णनाथ अंदुरे यांनी बक्षिसं दिली. कवी संमेलन यशस्वी होण्यासाठी बालानंद परिवारातील गणेश कांबळे , सुधाकर ढाकणे , युवराज जगताप , संदीप राठोड , राकेश पवार , नारायण मंगलाराम  लहू बोराटे , राघू जपकर  यांनी मेहनत घेतली.

अतिशय उत्साही व आनंददायी वातावरणामध्ये बाल कवी संमेलन पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button