मीडसांगवी सेवा सोसायटी वर आमदार मोनिकाताई राजळे गटाचे वर्चस्व

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मीडसांगवी सेवा सोसायटी वर आमदार मोनिकाताई राजळे गटाचे वर्चस्व
पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील सेवा सोसायटी साल सिद्ध बाबा शेतकरी पॅनल एकतर्फी विजयी झाला याच अनुषंगाने खरवंडी कासार येथे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना चे संचालक बाळासाहेब गोल्हार यांच्या वतीने मिडसांगवी येथील सेवा सोसायटी मध्ये विजय झालेल्या नवनिर्वाचित उमेदवारांचा सन्मान करण्यात आला गेली 30 ते 35 वर्षापासून मिडसांगवी सेवा सोसायटी वरती साल सिद्ध बाबा शेतकरी पॅनल वरती वर्चस्व असून आमदार मोनिकाताई राजळे यांच्या आधिपत्याखाली एक हाती सत्ता आली असुन या साल सिद्ध बाबा पॅनलचे नेतृत्व बापूराव पठाडे, दत्तू नाना पठाडे, जमाल शेख ,मनोहर काकडे, राजाराम गाडेकर, वसंत पठाडे ,रमेश भवर ,शरद गाडेकर ,महेश हजारे, राजेंद्र गरड, माऊली सूळ ,यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनलचे नेतृत्व केले जाते यावेळी विजयी उमेदवार राजेंद्र मुळे ,अशोक घोंगडे ,गणेश हजारे, राम पठाडे ,संदीप भवर, अंबादास भवर ,गोरक्ष भवर ,हरी गाडेकर, आश्रू सूळ ,बन्सी नांगरे, महमद शेख ,शारदा पवार, लिलाबाई सूळ,हे सर्व उमेदवार विजय होऊन येणाऱ्या भावी काळामध्ये सेवा सोसायटी मध्ये अमुलाग्र बदल करू न शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन यावेळी यांनी दिले
सत्कार समारंभ वेळी मा. ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब जाधव पाथर्डी तालुका युवा मोर्चा चे महेश बोरुडे व ग्रामस्थ उपस्थित होते