इतर

साहित्य निर्माण साठी शेवगाव ची भूमी सुपीक – राजकुमार तांगडे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगावची भूमी ही साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुपीक असून येथे निर्माण होणारे साहित्य समाजाला दिशादर्शक ठरेल, शिक्षणाच्या कविता सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल भाष्य करणाऱ्या असून समाजाला विचार करायला लावणाऱ्या आहेत असे मत प्रसिद्ध नाट्य,चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, शेवगाव तालुका शाखेच्या वतीने पद्मश्री बाळासाहेब भारदे विद्यालयात माजी प्राचार्य रमेश भारदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी विचारपिठवर प्रा.डॉ.शंकर चव्हाण,डॉ.कैलास दौंड,कवयित्री शर्मिला गोसावी,हरीश भारदे, प्रा.डॉ.अशोक कानडे, माजी उपनगराध्यक्ष एजाज काझी, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,रामकिसन माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.कैलास दौड म्हणाले की, ‘ परंपरेनुसार आलेली शिक्षण व्यवस्था आता बदलण्याची गरज असून उमेश घेवरीकर यांनी कवितेच्या माध्यमातून नेमक्या प्रश्नावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, उद्याची सशक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे असून त्या बाबतीत जागृती होण्यासाठी कवितेच्या माध्यमातून केलेला प्रयत्न निश्चितच उपयुक्त आहे.’
प्रा.डॉ.शंकर चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘शिक्षणाची दरी कमी होणे अजूनही आवश्यक असून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे,यासाठीचे प्रबोधन या कवितेच्या माध्यमातून होईल.
‘ विचाराचे आदान प्रदान होण्यासाठी पुस्तकावरील परीसंवाद महत्वाचे असून शेवगाव शब्दगंध ने हा चांगला उपक्रम राबविला आहे,’असे मत
कवयित्री शर्मिला गोसावी यांनी व्यक्त करुन संग्रहातील कविताचे वाचन केलं. डॉ.अशोक कानडे यांनी उमेश घेवरीकर यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष हरिभाऊ नजन यांनी केले. शेवटी प्रा. सुरेश शेरे यांनी आभार मानले. यावेळी विद्या भडके व शहाराम आगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भारदे हायस्कूल चे मुख्याध्यापक सरोदे,ॲड. मीनानाथ देहडराय,कैलास जाधव,आत्माराम शेवाळे,सुभाष जाधव, राजेंद्र झरेकर, प्राचार्य रसाळ, बापूसाहेब गवळी,विट्ठल सोनवणे, शितल हिवाळे, बाळू लांडे,अविनाश देशमुख,अनिल लांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, वैभव रोडी,अभिजित नजन यांनी विशेष परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button