रुंभोडीत विश्वकर्मा मंदिरासाठी खा.भाऊसाहेब वाकचोरे यांच्या निधीतून दहा लाखाचा निधी!

रुंभोडी प्रतिनिधी
– अकोले तालुक्यातील राजकीय दृष्टीने केंद्रबिंदू म्हणून ओळखणाऱ्या प्रवरा पट्ट्यातील. रुंभोडी हे राज्याला दिशा देणाऱ्या विचारांचे गाव आहे तालुका पातळीवर सर्व पक्षाची वेगळ्या संस्थेत पदाधिकारी म्हणून विरजमान आहे त्याचा एक भाग म्हणून तालुक्यातील बारा बलुतेदार समाज्याच्या उत्कर्षासाठी खादी ग्राम उद्योग मंडळ कार्यरत आहेत गेली सहा ते सात वर्षापासून सुतार समाजाचे पत्रकार भाऊसाहेब अण्णा वाकचोरे तालुका पातळी वरील खादी ग्राम उद्योग मंडळाचे संचालक म्हणून काम पाहत आहे आपल्या समाजाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून अकोल्याच्या आदिवासी ग्रामीण भागात चांगले संघटन तयार केले आहे त्याचा परिपाक म्हणून सुतार समाजाच्या व कारागीराच्या धार्मिक कार्यासाठी भोरगडा रुंभोडी तालुका अकोले येथे जिल्ह्यातील भव्यदिव्य विश्वकर्मा मंदिर उभे राहत आहे या मंदिरा साठी शिर्डी लोकसभा मतदार संघांचे खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांनी दहा लाखाचा निधी मंजूर केला आहे.
यावेळी खा.भाऊसाहेब वाकचोरे म्हणाले कि 2010 ला खासदार झाल्यानंतर शिर्डी मतदार संघात गावोगाव मंदिरांसाठी सभामंडप दिले त्यामाध्यमातून गावांच्या विकासाला दिशा मिळाली रुंभोडीतील कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे त्यांनी दहा लाख निधी देणेचे मान्य केले
खासदार निधी बरोबर आमदार निधी पण घ्या आणि चांगले भरीव काम करा असा सल्ला दिला कोणतेही राजकारण न करता दर्जेदार कामे करा कामाला दर्जा नसेल तर ते काम बंद करा गावासाठी दिलेलं काम पिढ्यानं पिढ्या टिकले पाहिजे चांगले शिक्षण संस्कार घडण्यासाठी आपण सुजान नागरिक म्हणून पुढे आले पाहिजे तरुण कार्यकर्त्यांनी आपपासतील मतभेद विसरून विकास कामासाठी एकोपा ठेवावा असे आवाहन त्यांनी केले
अकोले येथील धुमाळवाडीतील मंदिरालाही खासदार निधी दिला जाईल असे असे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख मच्छिन्द्र शेठ धुमाळ, शिवसेनचे महेश नवले,प्रदीप हासे, प्रमोद मंडलीक,बाळासाहेब कुमकर,पत्रकार.भाऊसाहेब वाकचौरे,बबनराव तिकांडे,केरूशेठ वाकचौरे,प्रा. डॉ. बाळाचंद वाकचौरे,प्रभाकर वाकचौरे,नारायण वाकचौरे,रमेश वाकचौरे,अरुण वाकचौरे,रामदास वाकचौरे
भाऊसाहेब,एकनाथ वाकचौरे,प्रशांत धुमाळ उपस्थिती होते


