बेलापुर (ता अकोले) येथे संतसंग उद्घाटन समारंभ संपन्न

विनय समुद्र
कोतुळ प्रतिनिधी
*जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संप्रदाया मार्फत बेलापुर ता अकोले जि अहिल्यानगर येथे नवीन संतसंग उद्घाटन समारंभ संपन्न झाला
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संप्रदायामार्फत रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी आरतीचे रूपांतर नवीन संत संघात उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले .
कार्यक्रमात प्रवचनकार जागृतीताई दरणे यांचे सुश्राव्य प्रवचन संपन्न झाले. प्रशिक्षणार्थी प्रवचनकार.दीपक भाऊ तांबे यांच्या माध्यमातून आरतीचे रूपांतर संतसंगामध्ये करण्यात आले.
उद्घाटनाप्रसंगी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेची मिरवणूक , शोभायात्रा सुंदर सुशोभित अशा रथात , काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य कलशधारी महिला, महिलांचे लेझीम पथक, निशान धारी महिला पुरुष , भजनी मंडळ यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता बेलापूर येथील गुरुबंधू यजमान यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पूजन विधीसाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी वेदपाठ शाळेतील पुरोहित श्री.निवास बोगाडे गुरुजी उपस्थित होते. तसेच मुलींच्या वेदपाठशाळेतील प्रशिक्षणार्थी महिला पुरोहित रोहिणी येवले गुरुजी, ईश्वरी पालकर गुरुजी व ईश्वरी गाडेकर गुरुजी उपस्थित होत्या.
यांच्यासह अकोले तालुका सेवासमिती व उत्तर अहिल्या नगर जिल्हा सेवा समिती सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवचन संपल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला



