इतर

संत गोरोबांनी नामस्मरणाचा आदर्श निर्माण केला : – ह.भ.प. गोविंद महाराज मलिक

श्रीरामपूर (वार्ताहर ) संत जगाच्या कल्याणासाठी असतात. भगवंत, सामन्य माणूस, संत हे तीन वर्ग समजून घ्या. संत जगाच्या कल्याणासाठी असतात. घेता विठोबाचे नाम, पर्वत जळती पापे, हे लक्षात घ्यावे.श्रीसंत गोरोबा कुंभार यांनी उत्कट नामस्मरणाचा आदर्श निर्माण केला, असे विचार ह.भ.प. संत चरणरज गोविंद महाराज मलिक यांनी व्यक्त केला.

लाडगाव येथील वाडेकर वस्ती वीट भट्टीवर ह.भ.प. संत चरणरज गोविंद महाराज मलिक यांचे संतांचे प्रबोधन आणि मानवी जीवनावर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी हभप मलिक महाराज बोलत होते. गं.भा. सुलोचना कारभारी वाडेकर, राजेंद्र कारभारी वाडेकर, बाळासाहेब कारभारी वाडेकर, रावसाहेब कारभारी वाडेकर, सौ. मंगलताई अप्पासाहेब जोर्वेकर आदिंनी आयोजित केलेल्या या प्रवचन सेवेत ह.भ.प. मलिक महाराज यांनी संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे, संतमेळा आणि त्यांच्या साहित्य निर्मितीचा आढावा घेतला.

संत परीक्षक श्रीसंत गोरा कुंभार चरित्र समजून घेतले पाहिजे असे सांगून नामस्मरणात तल्लीन असलेल्या गोरोबांच्या माती तुडवताना मूलही तुडवले गेले पण भगवंतांनी त्यांचे मूल परत दिले, हा भक्तीमहिमा समजून घ्या. योगिराज गंगागिरी महाराज, सदगुरू नारायणगिरी महाराज, महंत रामगिरीजी महाराज यांचे अध्यात्म कार्यातील महत्त्व सांगितले. याप्रसंगी प्रा. विलासराव तुळे, विलासराव सैंदौरे, हेमंत बबनराव सोनवणे, चेतन तुळे, पवन संजय उपाध्ये, छबुराव सोनवणे आदिंनी प्रतिमापूजन केले.

कै. कारभारी वाडेकर यांचे जीवन प्रेरणादायी : – प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, ह.भ.प. संत चरणरज गोविंद महाराज मलिक ह्यांची कीर्तनसेवा म्हणजे ज्ञानामृत आहे, त्यांचा संत अभ्यास आणि प्रभावी समाजप्रबोधन कौतुकास्पद आहे. लाडगावच्या वाडेकर परिवारातील कारभारी पंढरीनाथ वाडेकर यांच्याशी सर्वांचा प्रेमाचे संबंध होते. त्यांनी कष्टातून आणि लोकप्रेमातून आयुष्य उभे केले. त्यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी आहे, असे सांगून वाडेकर परिवाराचे मोठेपण सांगितले.यावेळी प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ह.भ.प. मलिक महाराज यांना ह्या मंदिरातून व वाचता वाचता ही पुस्तके सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button